सावद्यात पिर मंजन शाह वली यांच्या संदल शरीफ मिरवणूकीत आ.चंद्रकांत पाटील यांचा सत्कार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)

सावदा :- येथील हिंदू मुस्लिम ऐकताचे प्रतिक हजरत पिर मंजन शाह वली यांचा सालाबादप्रमाणे दरवर्षी ७ जून रोजी उर्स व संदल शरिफ शहरात मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.तरी या अनुषंगाने  यंदा ७ जून रोजी देखील जागृत दर्गी हजर पिर मंजन शाह वली यांचा संदल शरिफची मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली.[ads id="ads1"]  

  यादरम्यान मिरवणूक चांदनी चौकात आली असता यात मुक्ताईनगर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील आपला सहभाग नोंदविला.यावेळी मुराद तडवी,माजी.नगरसेवक शेरखा पठाण,सह संदल कमेटीच्या लोकांनी त्यांचा शाल व पुष्पमाला देवून त्यांचे सत्कार केले.[ads id="ads2"]  

यानंतर पिर मंजन शाह वली यांच्या दर्गावर जावून आमदार चंद्रकांत पाटील यांनी दर्शन घेतले.यावेळी समाजसेवक सोहेल खान,शिवसेना शहरप्रमुख सुरज उर्फ बद्री परदेशी,शहिद अब्दुल हमीद संस्थेचे पदाधिकारी फिरोज खान,अमजत खान,गोपाळ सोनवणे,वसीम शेख,इरफान मियां,साजीद खान इलेक्ट्रिशन वाले इत्यादी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!