मोठा वाघोद्यात अग्नीवीर सैनिकांचे जंगी स्वागत सैन्यदलाचे प्रशिक्षण केले पूर्ण : गावात औक्षण सत्कार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 



रावेर प्रतिनिधी / मुबारक तडवी 

भारतीय सैन्यदलात अग्नीवीर सैनिकांची  भरतीत सैनिकी प्रशिक्षण पुर्ण करुन मोठा वाघोदा येथील सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील प्रमोद राजेंद्र वाघ वं दिपक मोहन कात्रे या दोघाही सैनिकांनी आठ महिन्याचे सैनिकी प्रशिक्षण केले प्रशिक्षणानंतर प्रथमच गावी परतलेल्या या भारतीय सैनिकांचे मोठा वाघोदा बु. तालुका रावेर गावातील बसस्थानक परिसरात नागरिकांनी स्वागत करीत त्यांचीओपन जीप वरुन सवाद्य ढोल ताशांच्या गजरात स्वागत पर  मिरवणूक देखील काढण्यात आली. [ads id="ads1"]  

  वर्षभरापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या अग्नीवीर भरतीत मोठा वाघोदा येथील प्रमोद राजेंद्र वाघ यांची टेक्नीकल पदासाठी तर दीपक मोहन कात्रे याची जीडी पदासाठी निवड झाली होती. निवडीनंतर त्यांना मध्यप्रदेशातील जबलपूर येथे सैनिकी प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले - होते. तेथे आठ ते नऊ महिन्यांचे -प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले  मिरवणुकीत दरम्यान गावात ठिकठिकाणी भरती झालेले दोन्ही सामान्य कुटुंबातील सुपुत्र जबलपूरला प्रशिक्षण पूर्ण करुन आलेले प्रमोद वाघ व दिपक कात्रे हे दोन्ही सर्व सामान्य कुटुंबातील मुले असून त्यांनी मोठा वाघोदा येथील जिल्हा परिषद शाळा प्रकाश विद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. [ads id="ads2"]  

  शिक्षण घेत असतांनाच देशसेवेची देशभक्तीची करण्यातची इच्छा निर्माण झाली होती. त्यामुळे दोघांनी सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहिले होते. सैन्यात भरतीसाठी त्यांना गावातील सैनिकांसह ग्रामस्थांची प्रेरणा लाभली, योगायोगाने पहिल्याच भरतीत त्यांची निवड झाली व प्रशिक्षण ही पुर्ण करुन त्यांचे गावात आगनानावेळी मोठा वाघोदा वासिय आप्त नातेवाईक यांनी दोघं अग्नीवीरांचे 

औक्षण केले तसेच गावकर्यातर्फे जंगी सत्कार करण्यात आले. जीप वरुन ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीत  संपूर्ण गावकरी सहभागी झाले होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!