ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
रावेर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा रावेरची सभा निंभोरा येथे दिनांक २९ शनिवार रोजी ठीक दुपारी २ वाजता संपन्न झाली.सविस्तर वृत्त असे की,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना, मुंबई या संघटनेची रावेर तालुका स्तरीय सभा खेळीमेळीच्या वातावरणात रावेर तालुका अध्यक्ष प्रमोद कोंडे यांच्या अध्यक्षतेखाली निंभोरा बु.येथील कृषी तंत्रज्ञान विद्यालय येथे घेण्यात आली.[ads id="ads1"]
त्यात अनेक विषय घेण्यात आले. सर्वप्रथम मागील सभेचा वृत्तान्त संघटनेचे सचिव इकबाल पिंजारी यांनी वाचून दाखविले तसेच आगामी काळात संघटनेची तालुका कार्यकारणीची १वर्ष मुदत संपत असून सभेतील सदरील विषयानुसार संघटनेच्या रावेर तालुका अध्यक्षपदी जे सदस्य इच्छुक असतील त्यांची नावे घेऊन वरिष्ठांना पाठविणेबाबत ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. अध्यक्ष पदासाठी रवींद्र महाजन, इकबाल पिंजारी, विजय एस अवसरमल तसेच सुमित पाटील हे इच्छुक असल्याने त्यांची नावे सर्वानुमते वरिष्ठांना पाठविण्याबाबत प्रमोद कोंडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला.[ads id="ads2"]
सदर सभेस विनोद कोळी उर्फ शिवा भाई (खानदेश विभागीय प्रसिध्दी प्रमुख), प्रमोद कोंडे (अध्यक्ष), इकबाल पिंजारी (सचिव), प्रभाकर महाजन (उपाध्यक्ष), रवींद्र महाजन (कार्याध्यक्ष),कैलास लवंगडे, संजय पाटील, विजय एस अवसरमल (संघटक), प्रकाश पाटील (सल्लागार)विजय के अवसरमल (सह सल्लागार)सुमित पाटील (सदस्य) संजीव चौधरी (सदस्य) आणि संजय पाटील(सदस्य) तसेच इतर सदस्य उपस्थित होते.



