यावल (सुरेश पाटील ) सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वर्ल्ड व्हीजन इंडिया च्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यातील एनजीओंनी एकत्र येत" एनजीओ फोरम"ची स्थापना करण्यात आली आहे फोरमच्या अध्यक्षपदी वर्ल्ड व्हिजनचे समन्वयक जितेंद्र गोरे यांची तर उपाध्यक्षपदी अमळनेर आधार संस्थेच्या रेणुप्रसाद यांची आणि सचिव पदी चोपडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष महेश शिरसाठ यांची वर्णी लागली आहे.[ads id="ads1"]
सामाजिक क्षेत्रात वेगवेगळ्या एनजीओ कार्यरत असून छोट्या मोठ्या स्वरूपात जनहिताचे काम तळागाळापर्यंत करीत आहेत .या संस्थांच्या कामास मोठे स्वरूप यावे या विशाल विचाराने एकत्रित येत एनजीओ फोरमची स्थापना करण्याचा विचार पुढे आला आणि नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी जितेंद्र गोरे, उपाध्यक्षपदी, वेणूताई प्रसाद, सचिव महेश शिरसाठ, सहसचिव निलेश शिंदे, सल्लागार संजय पाटील, कोषाध्यक्ष प्रतिभा पाटील यांची निवड करण्यात आली आहे.[ads id="ads2"]
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार सातपुते, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, पोलिस निरीक्षक उध्दव ढमाळे, कृषी विस्तार अधिकारी योगेंद्र अहिरे,चाईल्ड हेल्पलाईनचे कुणाल शुक्ला,संकल्प सेवा फाऊंडेशनचे राहुल माळी, जिव्हाळा फाऊंडेशनचे राहुल चौधरी,जनसाहसचे निलेश शिंदे, पुष्कर बहुउद्देशीयच्या सुवर्णा सोनार, जनहित संस्थेचे जयप्रकाश बिऱ्हाडे, शिवचरित्र फाऊंडेशनचे सचिन पाटील,इलाईट फाउंडेशनचे काशिनाथ कांदे यांच्यासह जिल्ह्यातील ३०/४०सामाजिक संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते. आभार जितेंद्र गोरे यांनी मानले तर सुत्र संचालन रतिलाल वळवी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी वर्ल्ड व्हिजन इंडिया टीमचे निखिल सिंग,विजेश पवार, अंकिता मेश्राम, स्वयंसेवक आरती पाटील,वैष्णवी पाटील, रचना जाधव, जितेंद्र पाटील यांनी मेहनत घेतली.



