खिर्डी ता.रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर तालुक्यातील रेंभोटा येथून सुमारे 15 वर्षांनी पुन्हा बस सेवा सुरू झाली असून गावात जनतेत आनंदा चे वातावरण दिसून आले या आधी रावेर जळगांव मुक्कामी बस सेवा सुरू होती पण रस्त्याचा बिकट अवस्ते मुळे बस सेवा खंडित करण्यात आली होती.त्यामुळे गावातील लोकांना तसेच विद्यार्थांना सुमारे 1 ते 1.5 किलोमिटर पायी जावे लागते असे.[ads id="ads1"]
तसेच गावातून रावेर किंव्हा फैजपूर सावदा ज्यायचे असल्यास गावा पासून 1 किलोमिटर वर असलेल्या फट्या पर्यंत पायी जावे लागत असे. आता शिंगाडी रेंभोटा पुरी गोलवडा बस सेवा सुरू झाल्याने ग्रामस्थांचे व विद्यार्थांना याच्या अडचणी कमी झाल्या असून सर्व गावात आनंदाचे वातावरण दिसून आले.[ads id="ads2"]
त्या प्रसंगी 15 वर्षांनी प्रथमच बस गावात आली असता गाडीची पूजा करून बस ड्रायव्हर आणि कंडक्टर याची शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले त्या प्रसंगी गावातील सरपंच,ग्रामसेवक,पोलिस पाटील,ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील जेष्ठ श्रेष्ठ विद्यार्थी तसेच सर्व नागरिक उपस्थित होते.