आय.आय.आर.एस.इस्रोची कार्यशाळा श्री.व्ही.एस.नाईक महाविद्यालय रावेर येथे संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : दिनांक 24 जुलै 2024 बुधवार रोजी आय.आय.आर.एस. इस्रो डेराडून यांचे मार्फत आयोजित  एनआय सारची आपत्ती व्यवस्थापन क्षमता यावर एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा श्री.व्ही.एस.नाईक कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, रावेर येथील भूगोल विभागामार्फत आयोजित करण्यात आली.या कार्यशाळेचे आयोजन भारतीय अंतराळ संशोधन संस्थान, भारतीय अंतराळ संशोधन संघटना आणि अंतराळ विभाग, भारत सरकार यांच्या सहकार्याने करण्यात आले. [ads id="ads1"] 

महाविद्यालयात या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य प्रा. एस. यू. पाटील यांनी भूषविले. आय.आय.आर.एस.इस्रो आउटरीच कार्यक्रमाचे महाविद्यालयीन समन्वयक आणि भूगोल विभाग प्रमुख  प्रा. सी. पी. गाढे यांनी आपल्या  प्रास्ताविकात संबंधित आय.आर.एस इस्रोचे हे उपक्रम 2015 पासून महाविद्यालयात राबवले जात आहेत आणि या कार्यक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रिमोट सेन्सिंग, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम,ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, ग्लोबल नेव्हिगेशन सॅटॅलाइट सिस्टम, एरियल फोटोग्राफ,सॅटॅलाइट इमेज,डिजिटल इमेज प्रोसेसिंग आणि जीआयएसच्या विविध सॉफ्टवेअरचे ज्ञान विनामूल्य मिळते असे प्रतिपादन केले.[ads id="ads2"] 

या  कार्यशाळेच्या आय.आय.आर. एस. इस्रो डेहराडून च्या समन्वयक नामवंत शास्त्रज्ञ डॉ. पूनम तिवारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे संबंधित कार्यशाळेचे कोर्स डायरेक्टर नामवंत शास्त्रज्ञ श्री.हरी शंकर यांनी विद्यार्थ्यांना सार इंफेरोमेट्री या विषयावर अनमोल मार्गदर्शन केले तसेच डॉ.अनुप कुमार, श्री सी.एम. भट,श्री. प्रेम रॉय या सर्व इस्रोच्या नामवंत शास्त्रज्ञांनी विद्यार्थ्यांना एन आय सिंथेटिक अपर्चर रडार या उपग्रहाचे आपत्ती व्यवस्थापनामध्ये काय महत्त्व आहे व  उपग्रह प्रणाली विषयी सखोल मार्गदर्शन केले. हा संपूर्ण कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डी. वाय. महाजन सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. एल. एम.वळवी यांनी केले. भूगोल विभागातील 25 विद्यार्थ्यांनी या आय आय आर एस इस्रोच्या कार्यशाळेसाठी रजिस्ट्रेशन करून आपली उपस्थिती नोंदवून कार्यशाळेस हजेरी दिली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!