(बुलढाणा/प्रतिनिधि) विविध लोककलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या, शासनाच्या लोककल्याण कारी योजना उपक्रमाचा प्रचार प्रसार करणाऱ्या लोककलावंत कोरोना महामारी पासून अतिशय दयनीय जीवन जगत आहेत , त्यांच्या विविध न्याय हक्क मागण्या बाबत शासनाचे लक्ष्य वेधन्यासाठी सांगली जिल्ह्यातील सांगोला येथे लोककलावन्त प्रबोधन परिषद,म रा यांच्या वतीने आयोजित दिनांक १७ व १८जुलै रोजी विचारमंथन कार्यशाला व न्याय हक्क मागणी बाबत आयोजित राज्यस्तरीय आन्दोलनास विविध लोककला सादर करणारे लोककलावन्त व वादक कलाकार यांनी उपस्थित राहावे असे आवाहन लोककलावन्त प्रबोधन परिषद ,म रा चे राज्य समन्वयक तथा कोषाध्यक्ष युवा लोकशाहीर प्रा गजेंद्र गवई यांनी एका प्रसिद्धि पत्रकाद्वारे केले आहे.[ads id="ads1"]
लोककलावन्त प्रबोधन परिषद, म.रा.ही राज्यव्यापी नोंदनीकृत लोककलावंताचे संगठन, त्यांच्या समस्या,न्याय हकासाठी लढनारी संघटना आहे. भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामार्फत लोककल्याण कारी योजना व उपक्रम यांचा प्रचार व प्रासार प्रबोधन कार्यक्रम मिळवून देणे व लोककलावंताना उदरनिर्वाहासाठी रोजगार मिळऊन देणारी, त्यांच्या समस्याची शासन दरबारी लोकशाही मार्गाने मांडणी करणारी नोंदनीकृत सांघटना आहे ज्यामध्ये भारत सरकार च्या सूचना प्रसारण मंत्रालय, गीत व नाटक प्रभाग ,केंद्रीय संचार ब्यूरो अंतर्गत तसेच माहिती सेवा संचालनालय यांच्या पैनल वर नोंदनीकृत कला संचाची शिखर संस्था आहे.[ads id="ads2"]
लोककलावंतांच्या विविध समस्या, अडचणी न्याय हक्क या बाबत दिनांक १७ जुलै रोजी विचार मंथन कार्यशाला व दिनांक १८ जुलै २०२४ रोजी राज्यस्तरीय आंदोलन करून शासन दरबारी मागण्या चे लेखी निवेदन आंतरराष्ट्रीय दर्जा चे सुप्रसिद्ध शाहिर सुभाष गोरे यांचे नेतृत्वात संघठनेचे राज्य उपाध्यक्ष शाहिर डी आर इंगले, सचिव शाहिर बालासाहेब मालुस्कर,शाहिर नानाभाऊ परिहार, शाहिर उत्तम गायकर, शाहीर उबाले, शाहिर रमेश गिरी, शाहीरा मिराताई दलवी, यांचे सह अनेक मान्यवर शाहीर, लोककलावंतांच्या प्रमुख उपस्थिति मध्ये आंदोलन करण्यात येत आहे.
सदर कार्यशाला व आंदोलन साठी उपस्थित सर्व राज्यातील लोककलावन्त ,वादक यांची आयोजकामार्फत निवास, भोजन व्यवस्था करण्यात येईल.अधिक माहिती साठी व नाव नोंदणी साठी राज्य समन्वयक प्रा गजेंद्र गवई मो. ०९८५०१२६१५४ यांचेशी संपर्क करावा.