रावेर येथे तहसील कार्यालयात महसूल पंधरवाडा अंतर्गत कार्यक्रम संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर  येथे तहसील कार्यालयात महसूल पंधरवाडा अंतर्गत  कार्यक्रम घेण्यात आला. महसूल विभागा मार्फत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे यात जेष्ठ नागरिक यांच्या साठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे जागृती अभियान घेण्यात आले.[ads id="ads1"] 

कार्यक्रम अध्यक्ष तहसीलदार बंडू कापसे हे होते तर प्रमुख अतिथी श्री क्षेत्र ओंकारेश्वर जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ एस आर पाटील, नायब तहसीलदार संजय तायडे हे होते तर  जिल्हा जेष्ठ नागरिक  संघ समन्वयक एस बी महाजन, मानकरे  गुरुजी, ऍड विजय महाजन, डॉ रवींद्र वानखेडे, डॉ सुरेश पाटील, पी टी महाजन, जगन्नाथ शामू महाजन, एन आर पाटील, एकनाथ पाटील, देखील उपस्थित होते.[ads id="ads2"] 

या तीर्थ दर्शन योजना व वयोश्री योजनेच्या शासन निर्णयाचे वाचन मंडळाधिकारी विठोबा पाटील यांनी केले.  सूत्रसंचालन मंडळाधिकारी यासीन तडवी यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन पाटील, स्वप्नील परदेशी, भूषण कांबळे, सलीम तडवी, संतोष पाटील  यांनी परिश्रम घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!