रावेर तालुका तायक्वांदो असोसिएशनच्या खेळाडूंचे कलर बेल्ट परीक्षेत उत्कृष्ट यश

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर  (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे रावेर तालुका तायक्वांदो असोसिएशनच्या खेळाडूंनी कलर बेल्ट परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे.

  कार्यक्रमाचे उ्घाटक रवींद्र पवार सर, प्रभाकर बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले तर श्रीकांत महाजन सर यांनी सूत्रसंचालन केले. [ads id="ads1"] 

 आभार जीवन महाजन यांनी मानले. रावेर ता. तायक्वांदो व जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सचिव अजित घारगे यांच्या उपस्थितीत तायक्वांदो कलर बेल्ट प्रात्यक्षिक परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत 58 खेळाडूंनी यश संपादन केले. तायक्वांदो हा खेळ शालेय स्पर्धेत, आंतर राष्ट्रीय, ओलंपिक मध्ये सुधा खेळला जात असून दहावी बोर्ड परीक्षेत खेळाडूंचे गुण ग्राह्य धरले जात असल्याने विद्यार्थ्यांना फायदा होतो. सैन्य भरती, पोलिस भरती तसेच शासकीय नोकरीतही खेळाडूंना विशेष सवलत मिळते. [ads id="ads2"] 

  त्यामुळे या खेळांकडे विद्यार्थी-पालकांनी सजगपणे पहावे तर खेळाडूंना  प्रशिक्षक जीवन महाजन,जयेश कासार रावेर तायक्वांदो असोसिएशनचे खजिनदार डॉ.सुरेश महाजन,श्रीकांत महाजन सर, विष्णू चारण सर, पुष्पक पवार,स्नेहल अट्रावलकर यांच्याहस्ते  विद्यार्थ्यांचा गौरव केला आणि रावेर तालुका तायक्वांडो असो अध्य. दिपक नगरे, डॉ. संदीप पाटील आयुष्य अग्रवाल, वाय. पि माळी, प्रमोद पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!