https://maps.app.goo.gl/dPBiHadfLTEGgCGu6





 

जन्म मृत्यू व विवाह नोंदणीचे अभिलेख बाबत गटविकास अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद आदेशाची केली पायमल्ली...?

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



यावल ( सुरेश पाटील ) लाडक्या बहिणी आणि इतर योजनांसाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात लाभार्थी विविध दाखले कागदपत्र मिळवण्यासाठी  भटकंती करीत आहे त्यात त्यांची फार मोठी आर्थिक पिळवणूक होत असून वेळ वाया जात आहे.जन्म मृत्यू व विवाह नोंदणीचे अभिलेखा बाबत जिल्हा परिषद जळगाव उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांनी सुमारे  ७ वर्षांपूर्वी तसेच दि.२९ जुलै २०२४ रोजी लेखी आदेश काढून जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी आणि सहाय्यक गटविकास अधिकारी यांना कळविले होते आणि आहे तरी सुद्धा संबंधित काही गट विकास अधिकारी आणि सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्याकडून आदेशाची पूर्तता झाली नसल्याचे आणि पायमल्ली झाल्याचे दिसून येत आहे.[ads id="ads1"] 

        जि.प. जळगाव उपकार्यकारी अधिकारी ग्रा.पं. यांनी ७ वर्षांपूर्वी म्हणजे  १७  मे २०१७ रोजी  आणि २९ जुलै २०२४ रोजी जळगाव जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी आणि सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांना लेखी आदेश काढून जन्म मृत्यू व विवाह नोंदणीचे अभिलेखा बाबत सूचना दिल्या होत्या आणि आहेत. 

          त्या लेखी सूचनांमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की पंचायत समितीचे अभिलेख कक्षात जमा असलेले सन १९६९ पासूनचे जन्म मृत्यू व विवाह नोंदणी रजिस्टर हे आपल्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतींना घेऊन जाऊन ग्रामपंचायत स्तरावरील नागरिकांना दाखले देण्याबाबतची सेवा उपलब्ध करून द्यावी तसेच यापुढे पंचायत समिती स्तरावरील जन्म मृत्यू व विवाह नोंदणी दाखले देण्यात येणार नाही असे नमूद केले होते आणि आहे. [ads id="ads2"] 

          महाराष्ट्र जन्म मृत्यू नोंदणी नियम २००० चे कलम ३० ( २ ) ( क ) ( ४ ) नुसार ६ वर्षापर्यंत जन्माची नोंदवही व एक वर्षापर्यंत मृत्यूची मृत जन्माची  ( उपजत मृत्यू ) नोंदवही निबंध स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवील व त्यानंतर अशा नोंद वह्या व नमुने सुरक्षित अभिरक्षेसाठी ग्रामीण भागासाठी गट विकास अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करेल व अभिलेख कायमस्वरूपी जतन करण्याची व्यवस्था त्यांच्या पातळीवर करतील असे नमूद केले आहे.

          दि.३० सप्टेंबर २०१६ रोजीचे पत्रानुसार पंचायत समिती स्तरावरून देण्यात येणाऱ्या जन्ममृत्यू व विवाह नोंदणीचे दाखले कोणताही शासन निर्णय किंवा वरिष्ठ कार्यालयाचे आदेश नसताना नियमबाह्य आदेश पारित करून पंचायत समिती स्तरावरील देण्यात येणाऱ्या जन्ममृत्यू व विवाह नोंदणीचे दाखले देणे बंद का केले..? याबाबत खुलासा सादर करावा व यापुढे पंचायत समिती स्तरावर नियमानुसार अभिलेखे अभिरक्षेत ठेवून जन्म मृत्यू व विवाह नोंदणी दाखले देण्याची कार्यवाही करावी असे स्पष्ट कळविले होते आणि आहे तरी सुद्धा जिल्ह्यात आणि यावल तालुक्यात काही ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ग्रामीण भागातील जनतेला माहिती न देता, दाखले न देता ग्रामपंचायत पासून ते पंचायत समिती कार्यालयापर्यंत भटकंती करायला भाग पाडत आहेत याकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा.पं. यांनी आपले लक्ष केंद्रित करून संबंधित कर्तव्यात कसूर करणाऱ्या काही गट विकास अधिकारी आणि सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!