महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर 18 व 19 सप्टेंबर ला जळगाव जिल्हा दौऱ्यावर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


  जळगाव  ( राहुल डी गाढे)  :

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या दिनांक १८ व १९ सप्टेंबर  २०२४ रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे -

  दिनांक १८ सप्टेंबर,  रोजी सकाळी महाराष्ट्र एक्सप्रसने जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन, सकाळी ८.३० ते ९.०० वाजता फैजाने पटेल ( विद्यार्थी महानगराध्यक्ष) यांच्या घरी सदिच्छा भेट, स्थळ - राजमालती नगर, दूध फेडरेशन जवळ, जळगाव, [ads id="ads1"] 

सकाळी ९ ते १०.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आढावा बैठक, सकाळी १०.१० वाजता जे. डी. सी. सी बँक कॉलनी शाहूनगर येथे स्वागत , सकाळी १०.३० ते ११ वाजता लाडकी बहिण योजना स्वाक्षरी मोहीम व मानवी साखळी कार्यक्रम शुभारंभ , सकाळी ११ ते १२.३० वाजता महिला संवाद मेळावा,काटया फाईल जळगाव, दुपारी १२.४५ वाजता एरंडोल येथे आगमन, दुपारी १ ते २.३० वाजता राखीव, दुपारी २.३० ते ४ वाजता विद्यार्थी संवाद, स्थळ :- डी.डी. सी.पी कॉलेज एरंडोल, सायंकाळी ४.३० वाजता एरंडोल येथून पारोळा कडे प्रयाण, सायंकाळी ५.०० वाजता पारोळा येथे आगमन, सायंकाळी ५.३० वाजता महिला संवाद कार्यक्रम, स्थळ :- विजया लॉन्स भडगांव रोड, पारोळा, सोईनुसार जळगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम, [ads id="ads2"] 

  गुरुवार दिनांक १९ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव कडे प्रयाण सकाळी ११ ते २.०० वाजता नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे जनसुनावणी, दुपारी २.०० वाजता मुक्ताईनगर कडे प्रयाण, दुपारी ३.०० वाजता मुक्ताईनगर येथे आगमन, दुपारी ३.०० ते ४.०० वाजता               संत मुक्ताबाई कॉलेजच्या विद्यार्थींशी संवाद, सायंकाळी ४.३० वाजता रेल्वे स्टेशन जळगाव कडे प्रयाण, सायंकाळी ६.२० वाजता महाराष्ट्र एक्सप्रेसने जळगाव वरुन पुणेकडे प्रयाण होणार आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!