पोलिस,होमगार्ड यांच्या बंदोबस्तात गणेश विसर्जन मिरवणुक शांततेत संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल ( सुरेश पाटील ) :  यावल पोलीस स्टेशन आवारात पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने यावल पोलीस आणि यावल होमगार्ड पथकाने श्री गणेशाची स्थापना केली होती, यावल शहरात ५ व्या दिवशी होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीत यावल पोलिसांनी यशस्वीपणे बंदोबस्त ठेवला होता. [ads id="ads1"] 

       शासकीय कामकाज कर्तव्य आटोपल्यानंतर यावल पोलीस व होमगार्ड पथकाने स्थापन केलेल्या गणपती बाप्पाची आज बुधवार दि.१८ रोजी सकाळी ११ वाजता गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक सर्व जाती धर्मातील नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात शांततेत यावल पोलीस कार्यालयाच्या आवारातून यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलिसांनी व होमगार्ड पथकांने काढली यात मात्र यावल शहरातील सर्व स्तरातील,सर्व जाती धर्मातील नागरिक स्री - पुरुषांनी,शांतता कमिटी सदस्यांनी पोलिसांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन नागरिक, समाजसेवक म्हणून मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन तगडा बंदोबस्त ठेवला ही विसर्जन मिरवणूक पोलिसांची मोठ्या उत्साहात व शांततेत पार पाडली.[ads id="ads2"] 

  या मिरवणुकीत सर्व जाती धर्मातील नागरिकांच्या भावनांचा आदर ठेवीत गुलाल न उधळता फुलांची उधळण करण्यात आली या विसर्जन मिरवणुकीत मात्र पोलिसांची भूमिका नागरिक सदस्यांनी स्वतःहून स्विकारत पोलिसांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत नागरिक म्हणून उपस्थिती देऊन तगडा बंदोबस्त ठेवला,यात पोलिसांचा मोठा उत्साह,जातीय सलोखा दिसून आला.पोलिसांचा गणेशोत्सव गणेश विसर्जन मिरवणूक नवीन प्रथा पांयडा म्हणून सर्वत्र कौतुकास्पद ठरला असला तरी यावल शहरातून दरवर्षी किमान एक गणेशोत्सव किंवा एक दुर्गोत्सव मंडळ सर्व जाती धर्मातील नागरिकांच्या सहभागाने स्थापन करून आपण स्वतः नागरिक म्हणून तगडा बंदोबस्त राखीत ( पोलिसांचा बंदोबस्त न घेता )  उत्सव शांततेत मोठ्या उत्साहात साजरे करून शासनाला समाजाला जातीय सलोखा कसा राखावा.हे आपल्या समाजाला, जनतेला, राजकारणाला, दाखवून द्यायला पाहिजे असे सुद्धा आता यावल शहरात बोलले जात आहे.