मुक्ताईनगर मतदार संघातील "या" अपक्ष उमेदवारावर हल्लेखोरांकडून गोळीबार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



 जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदार संघासाठी अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांचा बोदवड तालुक्यातील राजूर (Rajur Taluka Bodwad) गावात प्रचार रॅली सुरू असतांना कारमधून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे.या घटनेमुळे राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे.[ads id="ads1"]

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील बोदवड मुक्ताईनगर विधानसभा (Muktainagar,Vidhansabha) मतदारसंघाच्या निवडणूकीत अपक्ष म्हणून विनोद सोनवणे हे निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहे. दरम्यान, मंगळवारी ५ नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह बोदवड तालुक्यातील शिरसाळा (Shirsala Taluka Bodwad) येथील जागृती मारोती मंदीरात जावून प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरूवात केली आहे. त्यानंतर त्याचा प्रचार दौर बोदवड तालुक्यात सुरू झाला. [ads id="ads2"]

 पहा काय म्हणाले विनोद सोनवणे (व्हिडिओ)

 बोदवड तालुक्यातील राजूर (Rajur Taluka Bodwad) गावात विनोद सोनवणे यांची प्रचार रॅली सुरू असतांना कारमधून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे बोदवड (Bodwad) तालुक्यातील एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारमध्ये कुणालाही दुखापत झालेले नाही. दरम्यान याबाबत अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!