Mumbai: Elephanta Caves News : नाशिकहून मुंबईत बाळाच्या उपचारासाठी आलेल्या नाशिकच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

नाशिकहून मुंबईत बाळाच्या उपचारासाठी आलेल्या अहिरे कुटुंबीयांनी दुपारच्या मोकळ्या वेळेत एलिफंटा लेणी Mumbai: Elephanta Caves फिरण्याचा प्लॅन केला. तोच त्यांचा आयुष्याचा अखेर ठरला.[ads id="ads1"]

सगळे जण आनंदात अचानक नौदलाच्या (Indian Navy) स्पीड बोटीच्या धडकेने झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात राकेश नानाजी अहिरे यांच्यासह पत्नी हर्षदा आणि बाळाचा मृत्यू झाला आहे. 

नाशिकच्या पिंपळगाव (Pimpalgaon,Nashik)  येथून हे दाम्पत्य अंधेरीतील रुग्णालयात बाळाच्या उपचारासाठी आले होते. या घटनेने अहिरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुपारचा मोकळा वेळ असल्याने त्यांनी एलिफंटा लेणीला Mumbai: Elephanta Caves जाण्याचे ठरवले.[ads id="ads2"]

  ठरल्याप्रमाणे लहान बाळासह बोटीने प्रवास सुरू झाला. मात्र हा प्रवास त्यांचा शेवटचा असेल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते. त्यांचा अहिरे यांचा बांधकामाचा व्यवसाय आहे. या अपघातात राकेश नानाजी अहिरे यांच्यासह पत्नी हर्षदा आणि बाळाचा मृत्यू झाला आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!