बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांने केली चौकशी
यावल( सुरेश पाटील) : यावल शहरात एका अंगणवाडी केंद्रात लहान मुलांना दिलेल्या पोषण आहारातील वरणात पालकांना मृत अळ्या दिसून आल्याने संपूर्ण शहरासह शिक्षण विभागात मोठी कळवळ उडाली याबाबतची माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी विजयसिंह परदेशी यांना मिळाल्याने त्यांनी काय चौकशी केली किंवा नाही याबाबत त्यांनी माहिती न दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.[ads id="ads1"]
लहान बालकांना दिला जाणारा पोषण आहार साठा किती दिवसाचा असतो.? आणि पोषण आहार पुरवठा किती प्रमाणात आणि केव्हा झाला आहे..? पोषण आहार शिजवताना किंवा तयार करताना साफसफाई केली जात नाही का..? [ads id="ads2"]
इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी अंगणवाडी केंद्राला भेट देऊन नेमकी काय चौकशी केली त्यांना दाखविलेल्या वरणात मृत अळ्या दिसल्याने पुढील कार्यवाही काय.? याबाबत यावल शहरातील नागरिकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.