केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांनी काही दिवसांपूर्वी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं. शाह यांच्या विधानाचे पडसाद महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर उमटले होते.काँग्रेसनं (Congress Party) अनेक ठिकाणी निषेध मोर्चे आणि आंदोलनं केली. अमित शाह यांनी आंबेडकरांबाबत केलेल्या विधानामुळे भाजप अडचणीत आली. असं असताना आता सोशल मीडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांचा देखील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात फडणवीस हे संविधान विरोधी असल्याचं दाखवण्यात आलं आहे.[ads id="ads1"]
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी (Maharashtra Cyber Police) विविध १२ लोक आणि सोशल मीडिया हँडल विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी विधीमंडळात केलेल्या वक्तव्याचा अर्धवट एडिट केलेला व्हिडीओ व्हायरल(Viral Video) केल्याप्रकरणी संबंधित १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस शोध घेत आहेत. तसेच ट्विटर, फेसबूक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर देखी याबाबतची तक्रार करण्यात आली आहे.[ads id="ads2"]
भारत शिंदे, शुद्धोधन सहजराव, नागपूर काँग्रेस सेवादल, सौरभ सिंह चौहान, मुकेश लवाळे, सुरेश काळे, प्रसाद साळवी, वरद कांकी, अमोल कांबळे, सैयद सलीम, द स्मार्ट २३०के, विष्णू भोटकर अशा व्यक्ती आणि सोशल मीडिया हँडलविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फडणवीस हे संविधान विरोधी असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न या आरोपींनी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीत (Loksbaha Election) भाजपने ४०० पारची घोषणा दिली होती. यावेळी भाजपच्या काही खासदारांनी संविधान बदलण्यासाठी आम्हाला ४०० जागा हव्या आहेत, अशा आशयाचं विधान केलं होतं. हा मुद्दा काँग्रेसनं देशव्यापी करत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी संविधान बदलाचं नरेटीव्ह देशभर मांडलं होतं. परिणामी २०१४ आणि २०१९ च्या तुलनेत भाजपला लोकसभा निवडणुकीत जोरदार झटका बसला. आता अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा भाजप डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान विरोधी असल्याचा मेसेज जात आहे. अशात फडणवीसांचा एडिट केलेला व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाल्याने भाजपसमोरच्या अडचणी वाढत आहेत.