ऐतिहासिक, धार्मिक, पर्यटन स्थळांना भेटी दिल्यामुळे ज्ञानात वृद्धी होते -- मुख्याध्यापक एस डी मोरे
धरणगाव प्रतिनिधी
साळवे तालुका धरणगाव येथील साळवे इंग्रजी विद्यालयाची शैक्षणिक सहल शिर्डीच्या साईबाबा दर्शन, ओझरचा विघ्नेश्वर, लेण्याद्रीचा गिरिजात्मक, रांजणगावचा महागणपती, मोरगावचा मयूरेश्वर, देवाची आळंदी, नारायणपूरचे दत्तमंदिर, केतकावल्याचा प्रतीबालाजी, रामदरा, जेजुरीगदाचा मल्लारी मार्तंड - खंडोबा, शनिशिंगणापूर, जुन्नरचा शिवनेरी किल्ला आणि पुण्यातील कात्रजचा राजीव गांधी प्राणी संग्रहालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांना संपूर्ण परिसराची माहिती करून दिली. विद्यार्थ्यांनी संपूर्ण परिसराची उत्सुकतेने पाहणी केली. [ads id="ads1"]
संपूर्ण पर्यटन स्थळांची माहिती ऐकून घेतली, ग्रहण केली व लिहून घेतली. नोंदी केल्या वेगवेगळ्या पर्यटन स्थळांचे फोटो, चित्र काढून घेतले. संपूर्ण सहल अतिशय खेडीमेडीने, आनंदाच्या वातावरणात संपन्न झाली.[ads id="ads2"]
यावेळी विद्यालयातील मुख्याध्यापक एस डी मोरे, ज्येष्ठ शिक्षक जी व्ही नारखेडे, एस पी तायडे, बी आर बोरोले, सहल प्रमुख व्ही एस कायंदे, ज्येष्ठ शिक्षिका रंजना नेहते, व प्रतिभा पाटील आणि कर्मचारी ललित भारंबे यांनी सहभाग घेतला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून आनंदाने, शांततेने सहल पार पाडण्यासाठी मदत केली.



