यावल (सुवर्ण दिप वृत्तसेवा) दि.10/12/2024 मंगळवारी सकाळी 10 वाजता मौजे यावल येथे तालुका फळ रोप वाटिका कार्यालयात मा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री कुर्बान तडवी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सदर कार्यक्रमात यावल, रावेर, चोपडा तालुक्यातील सर्व ठिंबक/तुषार सिंचन चे अधिकृत वितरक बांधवांना मा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तडवी साहेब यांनी सखोल मार्गदर्शन केले.[ads id="ads1"]
समस्या जाणून घेण्याची सर्व वितरक बांधवांना संधी दिली आणि ऐकून घेऊन त्या समस्या निवारण करण्यात येतील असे आश्वासन दिलं. त्यांनी आपल्या प्रतिपादनात सांगितले की आपल्या सातपुडा पायथ्याशी असलेल्या दुर्लक्षित अनु जमातीच्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना, अनु जातीच्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना शासकीय योजना व त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी सर्व स्तरातील लोकांनी, माध्यमांनी, शासकीय, निमशासकीय कर्मचारी/अधिकारी, समाजसेवक, प्रामुख्याने ठिंबक/तुषार सिंचन विक्रेते यांनी स्वयंस्फुर्ती ने भाग घेतला पाहिजे त्यांना या हरित क्रांतीच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे जेणेकरून त्यांना पायाभूत सुविधा, शेती विषयी माहिती मिळेल परिणामी शेती उत्पादन वाढीसाठी मदत होईल आणि त्यांचं राहणीमान/सामाजिक, आर्थिक परिस्थिती सुधारेल. शासनाच्या विविध प्रकारच्या योजना सुरू आहेत त्यापैकीच एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, क्रांतीवीर बिरसा मुंडा योजना आहे.[ads id="ads2"]
त्या योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहचला पाहिजे यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. जो निधी उपलब्ध आहे तो त्यांच्या उपयोगी पडेल असे प्रयत्न केले पाहिजे असे सांगितले. सर्व वितरक बंधू/कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या समस्या असतील तर त्या मांडून चर्चा केली आणि समस्या सोडवण्यासाठी आश्वस्त केले. सदर कार्यक्रम हा ड्रीप डीलर असोसिएशन यावल तालुका व कृषी विभाग यावल यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. सदर कार्यक्रमास मा सोपान पाटील जिल्हा अध्यक्ष ड्रीप असोसिएशन,मा प्रशांत चौधरी जिल्हा खजिनदार, मा विनोदभाऊ वाघोदे ड्रीप डीलर असो यावल तालुका अध्यक्ष, मा लाला पाटील रावेर तालुका अध्यक्ष, मा यशवंतराव चौधरी चोपडा तालुका अध्यक्ष, मा समाधान पाटील यावल तालुका उपाध्यक्ष, मा नरेशभाऊ चौधरी खजिनदार यावल तालुका असोसिएशन,मा नीलकंठ भंगाळे उपाध्यक्ष यावल तालुका, मा मनोज पाटील सरचिटणीस यावल तालुका,मा दीपक धनगर साहेब जिल्हा तंत्र अधिकारी जळगांव,मा वारे साहेब कृषी अधिकारी यावल, मा वाळके साहेब रावेर कृषी अधिकारी,नव्याने रुजू झालेल्या स तालुका कृषी अधिकारी कु मुक्ता मॅडम ,मा नितीन बाविस्कर मंडळ अधिकारी यावल,सर्व तालुका कृषी विभागाचे कर्मचारी/महिला कर्मचारी,तसेच यावल तालुक्यातील सर्व वितरक बंधू, तोलामोलाची माणसं/पदाधिकारी, चोपडा तालुक्यातील सर्व वितरक बंधू, रावेर तालुक्यातील सर्व वितरक बंधू, संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी/सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा वारे साहेब तालुका कृषी अधिकारी यांनी केले तर श्री विनोदभाऊ वाघोदे तालुका अध्यक्ष यावल ड्रीप डीलर असोसिएशन,यांनी आभार व्यक्त केले. अतिशय सांगोपांग चर्चा झाली, खेळीमेळीचे वातावरणात सभा संपन्न झाली