यावल ( सुरेश पाटील ) : आमदार अमोलदादा जावळे तुम्ही भुसावळ मार्गे यावल येऊन बघा नागरिकांसह वाहनधारकांची आमदारांना विनंती असे वृत्त सवर्ण दिप न्यूज (ऑनलाइन) रविवार दि.८ डिसेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध झाले होते.[ads id="ads1"]
या वृत्ताची दखल घेत आमदार जावळे यांच्या सूचनेनुसार संबंधितांचे ठेकेदाराचे डोळे उघडले आणि आणि अंजाळे गावाजवळ मोर नदीवरील पुलावर जो प्राणघातक आणि वाहनांच्या नुकसानीचा " जो खटका " निर्माण झाला होता त्या खटक्याचे काम आज बुधवार दि. ११ डिसेंबर २०२४ रोजी सुरू झाल्याने वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.[ads id="ads2"]
याचप्रमाणे या रोडवर अंजाळे गावापासून यावल शहरापर्यंत ठीक ठिकाणी रस्ता नादुरुस्त झाला आहे व खड्डे पडले आहे त्याची उत्कृष्ट दुरुस्ती तात्काळ व्हायला पाहिजे अशी सुद्धा मागणी यावल भुसावल परिसरातून होत आहे.