आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरम संघटनेची जालना येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 



दिनांक 12/12/2024 रोजी आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरम संघटनेच्या केंद्रीय व राज्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती जालना येथे बैठक संपन्न झाली.

सदर बैठकीत केंद्रीय महासचिव प्रकाश जी सरदार साहेब यांनी संघटनेची ध्येय धोरणे उद्दिष्ट सांगितले तसेच पत्रकारिता,सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील घटकांमध्ये संघटनेचे कशा पद्धतीचे योगदान राहील याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.[ads id="ads1"]

  तसेच संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक  पत्रकाराची काय जबाबदारी राहील व त्यांनी कशा पद्धतीचे योगदान संघटनेला द्यायचे याबद्दल माहिती दिली. 

तत्पूर्वी आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून ज्या केंद्राच्या आणि राज्याच्या शासकीय निमशासकीय स्तरावरील विविध योजनांचा येथोचीत लाभ घेण्याच्या दृष्टीकोनातून आपण उपाययोजना केल्या आहेत, आणि आपल्या अडगळीत पडलेल्या पत्रकाराला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत हे व्यवस्थित पटवून दिले.

त्यानंतर संघटनेचे केंद्रीय संघटक विजय खरात व राज्य सचिव देवचंद्र समदूर यांनी सुद्धा संघटनेबद्दल माहिती देऊन येणाऱ्या 31 जानेवारी मुकनायक दिनाच्या नियोजना संदर्भात माहिती दिली. [ads id="ads2"]

 सदर बैठकीला केंद्रीय महासचिव प्रकाशजी सरदार,केंद्रीय संघटक विजय खरात,महाराष्ट्र राज्य सचिव देवचंद्र समदूर,आशिष पैठणे जिल्हा उपाध्यक्ष जालना,दीपक हिवाळे तालुका संघटक जाफराबाद,सुधाकर चंदनशिवे तालुका अध्यक्ष जाफराबाद, तसेच ज्येष्ठ पत्रकार अच्युतराव मोरे संपादक दैनिक हिरकणी, ज्येष्ठ पत्रकार सुशील कुमार वाठोरे ,पत्रकार दशरथ वाकोडे व जालना जिल्ह्यातील इतर ही पत्रकारांची उपस्थिती होती

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!