राष्ट्रीय सेवा योजना चांगले व्यक्तिमत्व घडविण्याचे व्यासपीठ :- प्रा. डॉ. जयंत नेहेते

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

निंभोरा बुद्रुक ता.रावेर येथून जवळच बलवाडी येथे ऐनपूर येथिल सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. दि.२७ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय सेवा योजनेचे रावेर विभागीय समन्वयक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या मधील नेतृत्वगुण, संवाद कौश्यल्य विकसित करून आपले व्यक्तिमत्व चांगल्या पद्धतीने घडविता येते. तसेच विद्यार्थ्यांनी अश्या शिबिरात आयोजित केलेल्या व्याख्यानातून आपला बौद्धिक विकास करून आपली वैचारिक पटली वाढवली पाहिजे. सध्याच्या काळात तरुणांनी सामाजिक बांधिलकी जोपासणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले.

 यावेळी महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ. एस. एन. वैष्णव  व प्रणिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पी. आर. महाजन यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शिबिराला शुभेच्छा दिल्या.  कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार रासेयो स्वयंसेवक अनुराग धनगर याने मानले. यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.डी.बी.पाटील, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.सौ.रेखा पाटील, प्रा. संकेत चौधरी, कर्मचारी श्रेयस पाटील उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!