भुसावळ :- भुसावळ तार ऑफीस रोड येथील भारतीय पत्रकार महासंघ च्या पत्रकार भवनात बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.[ads id="ads1"]
त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी भारतीय पत्रकार महासंघ चे अध्यक्ष प्रदीपबापू पाटील यांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प हार अर्पण करून सामूहिक वंदना घेण्याचा आली.[ads id="ads2"]
यानंतर प्रमुख उपस्थिति असलेल्या पत्रकारानी अभिवादन केले व पुष्प अर्पण केले. या कार्यक्रमास खालील प्रमुख पत्रकार राकेश कोल्हे, उज्ज्वल बागुल, शकील पटेल, प्रकाश सरदार, राजेश तायडे, रवि दाभाडे, सतिश कांबळे, प्रकाश तायडे
इत्यादी स्थानिक पत्रकारा सह प्राजक्ता तायडे, रोशनी अडकमोल, जान्हवी अडकमोल इत्यादी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन भारतीय पत्रकार महासंघ च्या वतीने करण्यात आले होते.