राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर ऐनपूर महाविद्यालयात कार्यशाळा उत्साहात संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रोजगाराभिमुख व कौशल्यधिष्टित पिढी निर्माण करणारे शैक्षणिक धोरण - कुलगुरू प्रा विजय माहेश्वरी  

ऐनपूर: येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. सदर कार्यशाळेचे उद्घाटन प्रा. विजय माहेश्वरी, कुलगुरू,कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र जळगाव यांच्या शुभहस्ते भागवत विश्वनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. रोजगाराभिमुख व कौशल्यधिष्टित पिढी निर्माण करणारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० आहे.भारतीय ज्ञान परंपरा, आंतरवासियता, प्रशिक्षण, जबाबदारी इत्यादी वैशिष्ट्ये असलेले हे शैक्षणिक धोरण आहे असे प्रतिपादन कुलगुरू प्रा विजय माहेश्वरी यांनी उद्घाटनप्रसंगी केले.प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी केले. तर पाहुणे परीचय कार्यशाळेचे समन्वयक डॉ एस ए पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष भागवत भाऊ पाटील यांनी सांगितले की आमचे महाविद्यालय जरी ग्रामीण असले तरी आम्ही शैक्षणिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करु .प्रथम सत्रात वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता प्रा अनिल डोंगरे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे स्पिरीट या विषयावर दुसऱ्या सत्रात प्रा एस आर चौधरी , कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी कौशल्य पूर्ण व्यावसायिक अभ्यासक्रम या विषयावर मार्गदर्शन केले तसेच तिसऱ्या सत्रात प्रा राजेश जवळेकर, संचालक, नवोपक्रम,नवसंशोधन आणि साहचर्य मंडळ कबचौउमवि जळगाव यांनी आंतरवासियता व प्रशिक्षण या विषयावर तर चौथ्या सत्रात प्रा जगदीश पाटील, प्रभारी अधिष्ठाता मानव्य  विद्याशाखा यांनी भारतीय ज्ञान परंपरा व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची रचना या विषयावर मार्गदर्शन केले. समारोप चेअरमन श्री श्रीराम पाटील,सचिव संजय पाटील, प्राचार्य डॉ जे बी अंजने यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी समन्वय डॉ एस ए पाटील,व प्राचार्य डॉ जे बी अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली . परिसरातीलमहाविद्यालयातील प्राचार्य,प्राध्यापक, विद्यार्थी व पालक असे एकूण १६७ व्यक्तींनी या कार्यशाळेचा लाभ घेतला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ जे पी नेहते व प्रा डॉ डी बी पाटील यांनी केले आभार उप प्राचार्य डॉ एस एन वैष्णव यांनी केले

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!