यावल ( सुरेश पाटील )
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत दहा संघ सहभागी झाली त्यात अंतिम सामन्यात क्रीडा खेळाडूंनी जळगाव मुख्यालय संघावर मात केली.
जिल्हा परिषदेच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांची क्रीडा स्पर्धा आयोजित केली होती यात यावल महिला संघाने अंतिम सामन्यात जळगाव मुख्यालय संघाला पराभूत करून मालिका जिंकली.मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित साहेब, यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
या क्रीडा स्पर्धेत क्रिकेट सामन्यांमध्ये जिल्हाभरातून एकूण १० महिला संघ सहभागी झाले होते.यात प्राथमिक शाळेतील महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार सौ.ज्योत्स्ना संदीप केदारे होत्या. नॉक आऊट सामन्यांमध्ये दोन सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.अंतिम सामना यावल विरुद्ध जळगाव मुख्यालय महिला संघ असा झाला.यात जळगाव मुख्यालय संघाचा पराभव करीत यावल महिला संघाने विजेतेपद पटकावले.
यावल विजयी संघाच्या कर्णधार ज्योत्स्ना केदारे यांच्यासह कल्पना जगदीश माळी,ज्योती सनेर कविता जाधव,शीतल बाविस्कर,जयश्री पाटील,प्रिया पवार,मनीषा तडवी, शमीम तडवी,उज्वला सोनार, मीनल महाजन,रुपाली पाटील, पुष्पा चौधरी,वैशाली झांबरे,शबाना तडवी.आदी महिला शिक्षिका यांचा सहभाग होता.छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे यावल महिला क्रिकेट संघास माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित साहेब,डेप्युटी Ceo मॅडम मा.शिक्षणाधिकारी प्राथमिक विकास पाटील साहेब माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक कल्पनाताई चव्हाण मॅडम मा. गटविकास अधिकारी यावल. मंजुश्री गायकवाड मॅडम यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.सर्वांनी विजयी संघाचे कौतुक आणि अभिनंदन केले.



