यावल येथील बालसंस्कार विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीत घेतला मनसोक्त आनंद

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

यावल येथील बालसंस्कार विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीत घेतला मनसोक्त आनंद

यावल ( सुरेश पाटील )

यावल येथील बाल संस्कार विद्या मंदिर शाळेची शैक्षणिक सहल गजानन महाराज मंदिर भुसावळ, सोनबर्डी जामनेर,गौतम बुद्ध विहार चौका,बीबी का मकबरा,सिद्धार्थ गार्डन औरंगाबाद,प्रवरा संगम,दत्त मंदिर देवगड परत यावल अशा शैक्षणिक सहलीचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद घेतला. 

     सर्व पालक,विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने आमच्या शाळेची हिवाळी शैक्षणिक सहल शिस्तीत व आनंदी वातावरणात पार पडली

शैक्षणिक सहलीमध्ये संजय चौधरी व अतुल पवार सर यांनी अतिशय कौतुकास्पद कार्य करून आपल्या कार्याचा आदर्श ठसा उमटविला, मुख्याध्यापक सुनील माळी यांच्या मार्गदर्शनाने सहल मंत्री प्रशांत महाजन सर व पंढरीनाथ महाले सर यांच्या नियोजनानुसार सहल खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वी झाली व विद्यार्थ्यांनी मनसोक्त सहलीचा आनंद घेतला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!