जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी 100 मीटर धावणे क्रीडा स्पर्धेत उपशिक्षक समाधान जाधव जळगाव जिल्ह्यातून प्रथम

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


 जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : जळगाव जिल्हा अधिकारी आणि कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धा  आणि सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा दिनांक 11 जानेवारी आणि 12 जानेवारी 2025 रोजी  छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव या ठिकाणी पार पडल्या.

 या क्रीडा स्पर्धेमध्ये भुसावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदी या शाळेतील उपशिक्षक समाधान जाधव यांचा 100 मीटर धावणे जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आला. आणि 400 मीटर धावणे या स्पर्धेत जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक आला. 

मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव अंकित कुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, यांच्या हस्ते त्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

 या पारितोषिक समारंभ वितरण प्रसंगी जळगाव जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख, अधिकारी सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सर्व तालुक्यांमधील सहभागी शिक्षक, शिक्षिका कर्मचारी उपस्थित होते. त्याबद्दल उपशिक्षक समाधान जाधव यांचे भुसावळ तालुक्याचे गटविकास अधिकारी डॉ.सचिन पानझडे, गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, सहाय्यक गटविकास अधिकारी डी जी जाधव, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अधिकारी सचिन पाठक, भांडारपाल सुनिल उबाळे आणि सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षिका यांनी अभिनंदन आणि कौतुक केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!