चौकशी समितीत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या ऐवजी दुसऱ्या सदस्याची नियुक्ती करा : दिनेश भोळे यांनी केली तक्रार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

यावल ( सुरेश पाटील )

चौकशी समितीत नियुक्त करण्यात आलेले समिती सदस्य जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय जळगाव यांच्या ऐवजी दुसऱ्या सदस्याची नियुक्ती करावी अशी मागणी अभ्यासक शासकीय यंत्रणा व योजना विशेष अभ्यासक शासकीय आरोग्य यंत्रणेचे दिनेश कडू भोळे यांनी केली आहे.


दिनेश भोळे यांनी १३ जानेवारी २०२५ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव अंकित साहेब यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे की. कार्यालयाकडे दि.

२ जानेवारी २०२५ रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी नियमबाह्य पद्धतीने निकृष्ट दर्जाच्या औषधी

खरेदी केल्या बाबत तक्रार केलेली होती.त्यावर आपण दि.३ जानेवारी २०२५ रोजी प्राथमिक चौकशी ज्यांच्या वर आरोप आहेत त्यांचीच समीती स्थापन केलेली होती, त्या समीतीने दि.०६ जानेवारी २०२५ रोजी चौकशी अहवाल सादर

केला होता, त्यावर आपण संदर्भ ०१ अन्वये सुधारित आदेश पारीत केलेला असून तक्रारीच्या अनुषंगाने त्रिसदस्यीय चौकशी करण्याबाबत आपण सुचविलेले आहे,तरी आपण सदर त्रिसदस्यीय चौकशी - समीती मध्ये १) अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. जळगांव समिती सदस्य. २) जिल्हा शल्यचिकित्सक, शासकिय रुग्णालय, जळगांव समिती सदस्य. ३) मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि.प. जळगांव समिती सदस्य.यांची नियुक्ती आपण केलेली असुन सदर समितीतील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण मुरलीधर पाटिल,जिल्हा

सामान्य रुग्णालय जळगांव.यांची समिती सदस्य म्हणून नियुक्ती केलेली आहे, तरी मी आपल्या निदर्शनास ईच्छितो कि,डॉ.किरण मुरलीधर पाटिल यांना  ३ अपत्य असल्याने त्यांना शासकिय सेवेतून बडतर्फ करण्यात यावे यासाठी, संदर्भ ०३ व ०४ अन्वये मा. अप्पर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय मुंबई, मा.आयुक्त साहेब, आरोग्य सेवा, आरोग्य भवन मुंबई, मा. संचालक, आरोग्य सेवा, मुंबई, मा. उपसंचालक, आरोग्य सेवा,नाशिक मंडळ नाशिक, मा. सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा ( हिवताप ) नाशिक मंडळ नाशिक, मा.जिल्हाधिकारी साहेब, जळगांव तसेच मा. उच्च न्यायालयात याचिका क्र. WPST/32925/

2024 दाखल केलेली आहे,तरी त्यांच्या वरील शासनाकडे केलेल्या तक्रारी व न्यायालयातील खटला हा न्यायप्रविष्ट असल्या कारणाने आपण नियुक्त केलेल्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण मुरलीधर पाटिल यांच्या ऐवजी वैद्यकिय महाविद्यालयातील तज्ञांना सदर समितीत नियुक्त केल्यास चौकशी ही पारदर्शक होईल या अनुषंगाने होईल अशी तक्रार शासकीय यंत्रणा व योजना विशेष अभ्यासक शासकीय आरोग्य यंत्रणेच्या अभ्यासात दिनेश कडू मुळे यांनी केली आहे. तरी संबंधित अधिकारी नवीन समिती सदस्यांची नियुक्ती करणार आहे किंवा नाही याकडे लक्ष लागून आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!