यावल येथे हरिओम नगर मध्ये आग लागून अंदाजे ९ लाख रुपयांचे नुकसान

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

यावल (सुरेश पाटील) 

येथील फैजपूर रस्त्यालगत असलेल्या पेट्रोल पंप समोरील हरी ओम नगर मधील फ्लाईट बनवण्याचे दुकानात आज रात्री आग लागून सुमारे ९ लाखाचे नुकसान झाले.

आगीचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते यावल शहरातील विस्तारित भागात असलेल्या हरिओम नगरात गट नंबर ५० मधील प्लॉट नंबर पाच मध्ये स्लाईट बनवणाऱ्या दुकानात दि.१४ चे सकाळी २ वाजेचे सुमारास सर्किटने आग लागली पत्रांचे शेड १० क्विंटल सलाइटिंग ७० दरवाजे यासह मशनरी इत्यादी सामान जळून खाक झाला. सुमारे ९ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे सर्जरी ग्लास व अल्युमिनियम असे दुकानाचे नाव आहे दुकान मालक शेख जाकीर शेख कमरोद्दिन आणि शेख अस्लम शेख जाकीर हे आहेत यांनी ४ महिन्यापूर्वी महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून ४ लाख रुपये कर्ज घेतले होते तर २ महिन्यापूर्वी बडोदा बँकेतून २ लाख रुपयांचा उचल केलेला आहे असे एकूण ६ लाखाचे कर्ज त्यांच्यावर आहे कच्चे मटेरियल धरून दुकानात आठ ते दहा लाखाचा माल होता सुदैवाने मोठा अनर्थ टळला दुकानाच्या बाजूस असलेल्या अंजली गोपीनाथ सोनवणे यांचा रहिवास आहे त्यांच्या घरात दुकानालगतच किचन रूम होते या किचन रूममध्ये गॅस हंडी आहे सुदैवाने येथे काही नुकसान झाले नाही घटनास्थळी माजी उपनगराध्यक्ष इकबाल खान नसीर खान व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेटी देऊन दुकान मालकांचे झालेल्या नुकसानाबाबत खंत व्यक्त केली त्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!