रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :
जागृत हनुमान मंदिर मायक्रो व्हिजन अकॅडमी स्कुल मागे रावेर रोड विवरे बु. ता.रावेर या ठिकाणी अखिल स्तरीय महा ई सेवा केंद्र व आधार केंद्र संघटनेची जिल्हा सर्वसाधारण सभा संपन्न झाली सदरील सभेत आधार केंद्र चालक यांच्या समस्या व सेतू केंद्र चालक यांच्या समस्या व्ही एल इ मार्फत मांडण्यात आल्या त्यावेळी संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी यांनी सदरील समस्या ह्या शासन दरबारी मांडून सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तसेच सदरील समस्यांचे निवेदन जिल्हाधिकारी जळगाव यांना देणार असल्याचे ही त्यांनी सांगितले व त्यावेळेस जिल्ह्यातील सर्व व्ही एल ई यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ही वरिष्ठ पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आले. जिल्हा सर्वसाधारण सभेस जिल्हाभरातील 300 व्ही एल ई यांनी उपस्थिती दिली त्यावेळी
सदर बैठकीमध्ये जगदीश तायडे,महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी, राकेश चव्हाण जिल्हा सचिव भुसावळ , नकुल बारी जिल्हाकार्याध्यक्ष रावेर, धनराज घेटे रावेर तालुकाध्यक्ष किरण सावळे रावेर उपाध्यक्ष जयवंत चौधरी रावेर तालुका सचिव, स्वप्निल पवार, योगेश महाजन , प्रदीप पाटील,ललित सोनार, राहुल डी गाढे, राहुल जैन, वैभव तायडे, प्रदीप महाजन, विजय पाटील, प्रफुल्ल सराफ, हर्षल पाटील, संदीप यवतकरे, संतोष पाटील, प्रदीप जोशी, अमोल बारी, गणेश तायडे, युवराज लोखंडे, भावेश तायडे, अक्षय चौधरी, विजय चव्हाण, उपस्थित होते तसेच रावेर तालुक्यातील सर्व व्ही एल ई यांनी सभा संपन्नतेसाठी परिश्रम घेतले


