रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : - श्री.व्ही.एस. नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावेर चे उपप्राचार्य प्रा .संदीप धापसे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय रावेर वतीने दिला जाणारा कार्यगौरव पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा.धापसे यांचे रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.हेमंतभाऊ नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, प्रा.एस.यु. पाटील, डॉ.चिंचोरे, प्रा.डॉ .सुर्यवंशी, प्रा.डॉ.सोनार, प्रा.डॉ. नेमाडे , प्रा .व्ही.डी. पाटील, प्रा.डॉ.एस. आर.चौधरी, प्रा. डॉ. दलाल, प्रा डॉ.गणपतराव ढेम्बरे, प्रा डॉ.मुख्यद्ल, प्रा.डॉ.उमेश पाटील, प्रा.सत्यशील धनले , प्रा. चतुर गाढे, प्रा.नरेंद्र घुले, कार्यालयीन अधीक्षक श्री.युवराज बिरपन महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सामाजिक ,राजकीय क्षेत्रातील मान्यवर व मित्रमंडळी , नातेवाईकाकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




