रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : दि.१ जानेवारी २०२५ रोजि रावेर येथे सरदार जी जी हायस्कुल च्या प्रांगणावर भिमाकोरेगांव शौर्य दिनानिमित्त व संघटनेच्या वर्धापन दिनी समाजा करिता मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत
जळगांव जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ . आकाश चौधरी सर , रावेर तहसिलदार संजय तायडे साहेब , माऊली फाऊंडेशनचे संचालक स्त्री रोग तज्ञ डॉ . संदीप पाटील सर , रावेर पोलीस निरिक्षक विशाल जैस्वाल सर या मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
त्याप्रसंगी संघटनेच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा सुनैनाताई पवार , जळगांव जिल्हा अध्यक्षा नंदाताई भावटे , जिल्हा कार्याध्यक्ष ॲड . प्रविण इंगळे , जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव निकम , फैजपुर विभाग अध्यक्षा लक्ष्मी मेढे , उपाध्यक्ष अनिल इंधाटे ,इकबाल तडवी , विलास तायडे , अनिल तायडे , विजय धनगर , उज्वलाताई वाघ , निकिता भावटे , अनिताताई बाविस्कर , चंद्रकात सोनवणे उपस्थीत होते .




