सोलापूर जिल्हा प्रतिनिधी (सोपान चंद्रकांत चव्हाण)
अंगणवाडी मु पो. धानोरे (मा )तालुका-माढा .येथे आज दि . ३ जानेवारी २०२५ रोजी सावित्रीबाई फुले आणि बालिका दिनानिमित्त प्रतिमा पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व समाज सेविका होत्या त्यांचा जन्म 3 जानेवारी 18 31 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्हातील नायगाव येथे झाला.[ads id="ads1"]
विद्यार्थींनींची सावित्री बाई फुले यांची वेशभूषा करण्यात आली होती . सावित्रीबाई फुले आणि बालिका दिन निमित्त संगीतखुर्ची , चमचा लिंबू , तीन पायाची शर्यत , बादलीत नाणे फेकणे अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.[ads id="ads2"]
किती भोगले किती सोसले
तरीही तिने शिकवले
स्त्री शिक्षणाचे धडे पुढे
तिच्या सार्या लेकिनी गिरवले
सावित्रीच्या कर्तृत्ववान प्रत्येक स्त्री अभिमानी आहे इतिहासाच्या पानोपानी तुझ्या संघर्षाची कहाणी आहे. अंधातुन प्रकाशाकडे ज्यांनी महिलांना पोहचवंल चुल आणि मुल यापलिकडे ही जग आहे हे दाखवून दिलं. यावेळी सरपंच , शाळा व्यवस्थापन सदस्य उपस्थित होते.
त्यावेळी उपस्थित महिला -मालन ताई दावणे,वनमाला देशमुख ,पुनम देशमुख,सुरेखा क्षीरसागर अंगणवाडी सेविका अलका पाटील, दमयंती देशमुख, मदतनीस सुरेखा ताटे, ललीता देशमुख यांच्यासह छोटीसी मुलेदेखील उपस्थित होती.मोठ्या उत्साहात , आनंदात जयंती साजरी करण्यात आली.



