रावेर( सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर येथील स्वामी एज्युकेशनल ग्रुप द्वारा संत श्री लक्ष्मण चैतन्य जी बापू वृंदावन धाम पाल यांचे जयंती व गुरुवर्य श्री रा. का. पवार यांचे जयंती निमित्त रावेर तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धा घेण्यात आली, वकृत्व स्पर्धेचा विषय होता *राजा शिवछत्रपती* तालुकाभरातून जिल्हा परिषद शाळा, खाजगी प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय तसेच खुल्या गटातून वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रमाणे दिनांक 04 जानेवारी 2025 शनिवार रोजी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर रावेर येथे *राजे छत्रपती शिवाजी महाराज* या विषयावर तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. [ads id="ads1"]
या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री रवींद्र पवार सर होते. तर परीक्षक म्हणून विवरे येथील वासुदेव नरवाडे व निवृत्त मुख्याध्यापक आर.बी. महाजन सर होते, कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सचिव मनीषा पवार, संचालिका डॉक्टर सुखदा पवार, दीपक नगरे, मुबारक तडवी, केंद्रप्रमुख गणेश धांडे, कृष्णा पाटील, प्रकाश पाटील प्राचार्य राजू पवार, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका हिरकणी बोरोले, पर्यवेक्षिका कीर्ति कानुगो, आदी मान्यवर उपस्थित होते, सदर स्पर्धेमध्ये तिसरी पासून ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे तीन गट व एक खुला गट असे एकूण चार गट होते. [ads id="ads2"]
स्पर्धेच्या माध्यमातून शिवाजी राजांच्या कार्यावर त्यांच्या थोरवीवर त्यांच्या विविध गुणांवर विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला विद्यार्थ्यांचा जोश इतका होता की भाषण ऐकताना अंगावर शहारे येत होते, शिवाजी महाराजांच्या व मा जिजाऊंच्या तसेच मा भवानीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून जात होता. स्पर्धेमध्ये इयत्ता तिसरी ते पाचवीच्या गटातील लहान चिमुकल्यांनी आपल्या भाषणातून शिवरायांचा पोवाडा सादर करून परीक्षकांची मने जिंकली. स्पर्धेसाठी तालुक्यातील अनेक शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांच्या वाचन व वकृत्व गुणांना वाव देणे व महापुरुषांच्या चरित्रातून आपली संस्कृती व इतिहास जोपासणे या उद्देशाने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. असे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री रविंद्र पवार सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. तदनंतर कार्यक्रमाच्या शेवटी परीक्षकांचे मार्फत निकाल घोषित करण्यात आले व विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले. सर्व विजेत्यांना दिनांक 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंतीच्या दिवशी पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, वकृत्व स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे *गट क्रमांक 1*
(इयत्ता 3 री ते 5 वी)
प्रथम - स्नेहल विजय बिऱ्हाडे
आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल रावेर, द्वितीय- समर्थ योगेश पाटील स्वामी अकॅडमी ऐनपुर ,
तृतीय - आदिती भीमराव इंगळे
जि प शाळा सिंगत उत्तेजनार्थ - भूमिका हर्षल पाटील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर रावेर
*गट क्रमांक - 2*
(इयत्ता 6 वी ते 9 वी)
प्रथम -रिया अनिल महाजन स्वामी इंग्लिश मीडियम स्कूल रावेर, द्वितीय - दिपाली संतोष महाजन, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर रावेर, तृतीय- रूपाली संतोष चौधरी, धनाजी नाना विद्यालय खिरोदा, उत्तेजनार्थ - भावेश हरिश्चंद्र महाजन, महाराष्ट्र विद्या मंदिर वाघोड
*गट क्रमांक 3*
(इयत्ता 10 वी ते 12 वी)
प्रथम - तृष्णा महेंद्र जिरेमाळी
स्वामी ज्युनियर कॉलेज रावेर,
द्वितीय -काजल मनोहर इंगळे
स्वामी ज्युनिअर कॉलेज रावेर,
तृतीय - योगेश्वरी रमाकांत चौधरी सरस्वती विद्यामंदिर रावेर,
उत्तेजनार्थ - वंशिका सुनील महाजन महाराष्ट्र विद्या मंदिर वाघोड
*खुला गट*
प्रथम - हितेश लिलाधर भोरटक्के द्वितीय- गजानन विश्वनाथ धनगर
तृतीय - सोनाली विजय बिऱ्हाडे उत्तेजनार्थ-योगेश्वर दिलीप चौधरी.
उपस्थित सर्व अतिथी व मान्यवरांचे पालक वर्गांचे सर्वांचे संस्थेमार्फत रुपेश पाटील यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रवीण चौधरी, वर्षा अहिरे अनिता शिंदे भूपेंद्र पाटील यांचे सोबत स्वामी परिवाराचे सर्व विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले



