ज्ञानज्योत पेटवून मुलींना साक्षर केले, जननिंदेला दिला न घाबरता अध्यापन कार्य सुरू ठेवले....

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


उपदेश फाउंडेशन भुसावळ मार्फत सावित्रीबाई जयंती दिनी पिंपळगाव बुद्रुक शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य  वाटप याप्रसंगी अध्यक्ष रामटेके यांचे मार्गदर्शन.. 

तीन जानेवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव बुद्रुक येथे उपदेश फाउंडेशन द्वारा इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना पाटी,पेन्सिल, पेन, कंपास, वही, रंगपेटी, उजळणी या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सोबतच विद्यार्थ्यांना खाऊचे सुद्धा वाटप करण्यात आले .[ads id="ads1"]

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेंद्र रामटेके हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपदेश फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी केले. त्यामध्ये त्यांनी फाउंडेशन मार्फत होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मनोगत बी व्ही गायकवाड यांनी केले. त्यांनी शासनाद्वारा गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. आनंद जंजाळे शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले. शिक्षणामुळे मनुष्य उच्च पदावर पोहोचू शकतो हे पटवून सांगितले. यशराज हंबर्डीकर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली. स्त्रियांना शिक्षण दिल्यामुळे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया उच्च पदावर विराजमान झालेल्या आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे भुसावळ तालुका अध्यक्ष श्यामकुमार वासनिक यांनी विविध प्रयोगाच्या माध्यमातून विज्ञानाचे महत्त्व पटवून सांगितले. [ads id="ads2"]

  कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेंद्र रामटेके यांनी सावित्रीबाई यांच्या संघर्षमय जीवनाविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वैशाली भारुडे यांनी केले. तर आभार गजानन पालवे यांनी केले. या कार्यक्रमासाठी उपदेश फाउंडेशनचे सदस्य आर एस वानखेडे, अशोक रगडे, अरुण वाघमारे, अजय इंगळे, दीपक पाटील, किरण बोलके, सुवर्णलता जंजाळे, विलास सोनवणे, प्रवीण सरोदे, कृष्णा इंगळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षकांनी  आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!