आमदार अमोल जावळे यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती शहराध्यक्षांसह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

 यावल (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : 

देशाचे लाडके पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा संघटन पर्व महाराष्ट्र प्रभारी मा. आ. रवींद्र चव्हाण, तसेच ज्येष्ठ नेते मा. ना. श्री गिरीश महाजन, मा. ना. श्रीमती रक्षाताई खडसे, मा. ना. संजय सावकारे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली आणि आमदार मा. अमोल जावळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला.[ads id="ads1"]

या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन खरेदी-विक्री संघ, यावल येथे करण्यात आले होते. यावेळी यावल प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष नितीन बारी, महेंद्र पाटील, तुषार येवले, विशाल बारी, दीपक वारूळकर, सागर भोई यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला.

पक्षप्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे भाजपा परिवारात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. त्यांच्यासाठी पक्षाच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आणि त्यांच्या पुढील वाटचालीत यशाच्या शुभेच्छा देत, पक्षाच्या उद्दिष्टांसाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.[ads id="ads2"]

या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याला डॉ. कुंदन फेगडे, उमेश फेगडे (तालुका अध्यक्ष), तेजस पाटील, नारायण बापू चौधरी, हेमराज फेगडे, व्यंकटेश बारी, राहुल बारी, बबलू येवले, रितेश बारी, स्नेहल फिरके, भूषण फेगडे, कोमल इंगळे, मुकेश कोळी, विशाल शिर्के, योगेश देशमुख आणि भारतीय जनता पक्षाचे इतर सर्व सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पक्षप्रवेशानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी भाजपाच्या धोरणांना अधिक बळकटी देण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला. या सोहळ्याने पक्षाच्या सर्वसमावेशक कार्यपद्धतीत नवीन उर्जा संचारली असल्याचे दिसून आले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!