ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे २१ जानेवारी २०२२ रोजी गुर्जर बोलीभाषा साहित्य संवर्धन केंद्राची स्थापना करण्यात आली होती. त्या अंतर्गत श्री. चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळ, मोठे वाघोदे बु || “ हिरक महोत्सवी वर्षा निमित्ताने गुर्जर भाषिक अल्पसंख्यांक संस्थाचालक संघटना, जळगाव व गुर्जर बोलीभाषा साहित्य संवर्धन केंद्र ऐनपूर यांच्या वतीने “ गुर्जर बोली: साहित्य आणि लोकगाणी ” या दुसऱ्या पुस्तकाचा विमोचन समारंभ तसेच गुर्जर बोलीभाषा साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात मोठे वाघोदे येथे संपन्न झाले. [ads id="ads1"]
पुस्तक विमोचन व साहित्य संमेलनाचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव कुलसचिव मा.डॉ.श्री.विनोद पाटील यांचे शुभहस्ते झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने यांनी केंद्रामार्फत संकलीत साहित्य बाबत चर्चा केली व गुर्जर बोलीभाषेबद्दल आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषीतज्ञ मा.श्री.वसंतराव लक्ष्मण महाजन हे होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून वेदसाई हॉस्पिटल सावदा येथील बालरोगतज्ञ डॉ.विलास जगन्नाथ पाटील उपस्थित होते. साहित्य संमेलनासाठी ऊपस्थित साहित्यिक श्री.श्रीकांत रमेश पाटील पदवीधर शिक्षक रांजणी, श्रीमती सुरेखा मनीष पाटील रावेर, सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक व व्यंगचित्रकार श्री.शरद श्रावण महाजन एरंडोल, सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती विमल वेडू पाटील ऐनपूर, श्रीमती रजनी किशोर पाटील नवीन निंबोल, शिक्षिका श्रीमती रिता विजय चौधरी बलवाडी, श्रीमती सविता अरुण महाजन कल्याण आणि शिरपूर येथील अरुण रघुनाथ पाटील या सर्वांनी आपले साहित्य सादर केले. साहित्य सादर करीत असतांना त्यांनी गुर्जर बोलीभाषा साहित्य संवर्धन केंद्राचे समन्वयक प्रा. संजय भास्कर महाजन यांचे सहकार्य मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. [ads id="ads2"]
त्याच बरोबर केंद्राचे सदस्य प्रा.सतीश पाटील, प्रा.संजय पाटील, प्रा.अक्षय पाटील यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल आभार व्यक्त केले. तसेच सदर कार्यक्रमाला जळगांव जिल्ह्यातील सर्व गुजर भाषिक अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थाचालक, श्री.चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळ, वाघोदे बु ।। चे अध्यक्ष श्री.पी. टी. महाजन सर, उपाध्यक्ष श्री.श्रावण सिताराम महाजन, चेअरमन श्री.डी.के.महाजन, व्हॉ. चेअरमन श्री.विजयकुमार बाजीराव पाटील, सचिव श्री.किशोर जगन्नाथ पाटील, सहसचिव श्री.पी.एल. महाजन व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते, त्याचबरोबर ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.भागवत विश्वनाथ पाटील, चेअरमन मा.श्री.श्रीराम नारायण पाटील, सचिव श्री.संजय वामन पाटील व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी गुर्जर भाषिक अल्पसंख्यांक संस्थाचालक संघटना, जळगावचे अध्यक्ष तसेच मुख्याध्यापक मा.श्री.नरेंद्र विठ्ठल पाटील यांनी पुढाकार घेतला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन श्री.डी.के.महाजन यांनी केले, सुत्रसंचलन विद्यालयाचे वरीष्ठ लिपीक श्री.पवन चौधरी यांनी, तर आभार उपशिक्षक श्री.वैभव चौधरी यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री. चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी व संचालक मंडळाने तसेच प्रकाश विद्यालय व ज्यु. कॉलेज, मोठे वाघोदेचे मुख्याध्यापक श्री.व्ही.एस. महाजन , पर्यवेक्षक श्री.आर.पी.बडगुजर आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.


