यावल येथे आमदार अमोलदादा जावळे,डॉ.कुंदन फेगडे यांनी इस्लामी अतिरेकांचा जाळला पुतळा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



यावल ( सुरेश पाटील )

यावल येथे आमदार अमोल दादा जावळे.वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर कुंदन फेगडे यांच्यासह सकल हिंदू समाजातर्फे इस्लामी अतिरेक्यांचा पुतळा जाळून आपल्या संतप्त भावनांचे निवेदन यावल तहसीलदार सौ. मोहनमाला नाझीरकर यांना देण्यात आले.

जम्मू-कश्मीर येथे पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप हिंदू पर्यटक- नागरिकांचा मृत्यू झाला.याच्या निषेधार्थ यावल मधील तमाम सकल हिंदू बांधवांच्या पुढाकाराने निषेध मुक  मोर्चा काढण्यात आला.सर्व हिंदुत्ववादी संघटना यामध्ये सहभाग झाल्या.बोरावल गेट यावल येथून मोर्चाची सुरुवात करण्यात आली.यावेळी सदर मोर्चात सहभागी झालो.अखिल हिंदू मानवतेवर झालेला हा हल्ला आणि त्याचा निषेध करण्यासाठी मेन रोड यावल ते तहसीलदार कार्यालय या मार्गांवर विशाल जनसमुदाय लोटला.

यावेळी तमाम सकल हिंदू बांधवांच्या वतीने तहसीलदारांना निषेधार्थ निवेदन दिले.या मोर्चात सहभागी झालेल्या जागृत हिंदू बंधू आणि भगिनींचे मनापासून आभार व्यक्त करतो.यावेळी आमदार अमोलदादा जावळे यांच्यसह मोठ्या संख्येने हिंदू बांधव, माताभगिनी उपस्थित होते. 

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!