विवरे बु॥ येथे कश्मिर पहेलगाम येथील आतंकवादी हल्ल्यात मरण पावलेल्या २७ पर्यटकांना भावपूर्ण श्रध्दांजली! आणि क्रुर आतंकवादयांचा निषेध !
रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : २२ एप्रील रोजी जम्मू कश्मिर मधील पहेलगाम येथे झालेल्या क्रुर आतंकवादी हल्ल्यात २७ निष्पाप पर्यटकांचा मत्यू झाला. त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी याकरिता आज २५ एप्रील रोजी संध्याकाळी ६.३० वाजता बाजार चौकात विवरेकरांमार्फत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी पाकधर्जिण्या आतंकवादाचा तीव्र शब्दात जाहिर निषेध करण्यात आला.विवरे बु॥चे मा.सरपंच वासुदेव नरवाडे यांनी तीव्र शब्दात आतंकवाद्यांचा जाहीर निषेध केला. यावेळी कश्मिर पहेलगाम येथील आतंकवादी हल्ल्यात मरण पावलेल्या निष्पाप २७ पर्यटकांना दोन मिनिट मौन पाळून भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी मा. सरपंच सौ.आशा नरवाडे, मार्तंड भिरुड, सुरेश राणे , रफीक शेठ , विलास वामन बेंडाळे, सुरेश सोनवणे , विलास सपकाळ, इकबाल याकुब , भिमराव गाढे, न्यामतुल्ला खाटिक, युसुफ खाटीक, शकील मेंबर, विजय नरवाडे, सुनिल पाटील, लोटू महाजन, गोपाळ जुनघरे , भैय्या बोरोले, राहुल पाटील , सुरज नरवाडे, राजेंद्र पाटील, पंकज बोंडे, गणेश तळेले, अभि गुप्ता , सिध्देश राणे , पुंडलीक नरवाडे, जहीर मिस्त्री ,रईस शेख फैजुल्ला, आसिफ शे खालीक, फिरोज खान इस्माईल खान, हितेश जुनघरे, भानुदास राणे, सचिन राणे , दिपक पाटील, संतोष बेंडाळे, शकीलोददीन इसामोददीन, जमशेर तडवी,असलम शे.महेमूद, इम्रान शेख, रूपेश पाटील , कुणाल गुप्ता , रघुनाथ धनगर, तौसिफ नबी यासह मोठया संख्येने युवक, महिला, पुरूष उपस्थित होते.



