पोलिसांनी रूट मार्च काढून यावलकरांना दिला शांतीचा संदेश

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल ( सुरेश पाटील ) गणेशोत्सव व आगामी ईद-ए-मिलाद अशा हिंदू मुस्लिम बांधवांच्या सण उत्सवाच्या अनुषंगाने यावल शहरात सार्वजनिक शांतता,जातीय सलोखा अबाधित राहण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था कायम राहावी याकरिता डीवायएसपी नितीन बडगुजर यांच्यासह त्यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी आज दि.२९ शुक्रवार रोजी सकाळी दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान संपूर्ण यावल शहरातून रूट मार्च काढून यावलकरांना शांतीचा संदेश दिला. (ads)

यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी काढलेल्या रूट मार्च मध्ये यावल पोलीस व होमगार्ड दल सहभागी होते,रूट मार्च संपूर्ण यावल शहरातून काढल्याने एक शांतीचा संदेश यावलकरांपर्यंत पोहोचला आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!