सावदा सपोनि विशाल पाटील यांच्या कार्याचे कौतुक : लोकप्रिय आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला सत्कार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

सावदा सपोनि विशाल पाटील यांच्या कार्याचे कौतुक : लोकप्रिय आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला सत्कार

सावदा सपोनि विशाल पाटील यांच्या कार्याचे कौतुक : लोकप्रिय आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला सत्कार 

रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

सावदा येथे बंदुकीचा धाक दाखवून भुसावळ येथील नागरिकाचे दिड लाखांची लुट करण्यात आली होती या बाबत सावदा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता याप्रकरणाची तातडीने तपास चक्रे फिरवून सावदा पोलीसांनी दक्ष सजग होत ..अवघ्या 4 तासांतच 4 आरोपींना अटक केली तत्परतेने कारवाई करुन काही तासांतच आरोपींना ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत केला ही कारवाई सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे उपनिरीक्षक राहुल सानप यांच्या सह सावदा पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने चोखपणे कर्तव्य बजावत पार पाडली.  (ads)

 याच उत्कृष्ट कामाचा व कारवाई ची दखल मुक्ताईनगर मतदार संघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी घेतली व आज सावदा येथील नगरपालिकेच्या आढावा बैठकीत सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या कार्यतत्पर कर्तव्यदक्ष कार्याची स्तुती करत सपोनि विशाल पाटील यांच्या कार्यकर्तुत्वाचा गौरव पुर्ण सत्कार केला. (ads)

 व सावदा पोलिसांविषयी विश्वासपात्र कार्याबद्दल पोलीस प्रशासनाचे कार्यापध्दतीचा स्थानिकांतून समाधान तसेच कौतुक केले जात आहे यावेळी नगरपालिका कार्यालयात मुख्याधिकारी भूषण वर्मा,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,माजी नगरसेवक फिरोज खान पठाण,जे.के.भारंबे.यांच्या समवेत बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!