सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली.  (ads)

 कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.डॉ.पी.आर.गवळी यांनी “एक घंटा खेल के मैदान में!!” या घोषवाक्याखाली विद्यार्थ्यांना विविध खेळांची माहिती दिली. प्रा.अक्षय महाजन यांनी विद्यार्थ्यांना “फिट इंडिया प्रतिज्ञा” दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात हॉकी, क्रिकेट, कबड्डी, खो-खो, दोरीखेच, सायकलिंग, बॅटमिंटन, बुद्धीबळ, रग्बी यांसह स्थानिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांबरोबर प्राध्यापक व कर्मचारीवर्गांनीही उत्साहाने सहभाग घेतला. (ads)

कॉलेजमध्ये तीन दिवस (२९ ते ३१ ऑगस्ट) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून त्यात खेळ व फिटनेसविषयक व्याख्याने, क्रीडा वादविवाद, पारंपरिक खेळांच्या स्पर्धा तसेच “संडे ऑन सायकल” या उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित आहे. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.एन.वैष्णव सर यांनी विद्यार्थ्यांना अध्यक्षीय भाषणामध्ये “क्रीडा ही फक्त विजय-पराजयाची स्पर्धा नसून, संघभावना, शिस्त, आदर, मैत्री आणि आरोग्य या जीवनमूल्यांची शिकवण देणारे व्यासपीठ आहे.” असे  संबोधिले.  (ads)

  तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.पी.आर.महाजन, प्रा.डॉ.एस.ए.पाटील, प्रा.डॉ.जे.पी.नेहेते, प्रा.डॉ.एम.के.सोनावणे, प्रा.डॉ.व्ही.एन.रामटेके, प्रा.डॉ.एन.यु.बारी, प्रा.एस.पी.उमरीवाड, प्रा.प्रदीप तायडे, प्रा.ज्ञानेश्वर कोळी यांच्यासह श्री.हर्षल पाटील, श्री.श्रेयस पाटील, श्री.अनिकेत पाटील, श्री.प्रणय पाटील यांचे सहकार्य लाभले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!