रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : सावदा शहरातून दिनांक 25 ऑगस्ट रोजी बेपत्ता झालेल्या अजय सुधाकर फाटके वय 38 वर्ष रा. साळीबाग, सावदा या तरुणाचा मृतदेह बोरावल गावाजवळील तापी नदीच्या पात्रात आढळून आला. (ads)
हा तरुण दिनांक 25 ऑगस्ट रोजी फैजपूर येथे कापड दुकानात कामाला जात आहे, असे सांगून घरातून बाहेर पडला होता. 26 ऑगस्ट रोजी अजयची दुचाकी भुसावळ येथील तापी नदीच्या पुलावर सापडली होती. (ads)
काही प्रत्यक्षदर्शीनी त्याने पुलावरून नदीत उडी मारल्याचे सांगितले होते. तेव्हापासून त्याचा शोध सुरू होता. पुढील तपास हवालदार उमेश सानप हे करीत आहेत.



