रावेर प्रतिनिधी (प्रशांत गाढे)
धामोडी येथे 28 आगस्ट मध्यरात्री चोरीची घटना घडली आहे. 29 आगष्ट सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर निंभोरा पोलीस ठाण्यात तातडीने कळविण्यात आले. घटनास्थळी पोलीस दाखल होऊन पंचनामा करण्यात आला.
धामोडी येथील हेमंत शामराव महाजन यांच्या धामोडी, कांडवेल रोडवर असणाऱ्या श्री स्वामी समर्थ तोलकाटा ऑफिसचे कुलूप तोडून मौल्यवान साहित्य चोरीस गेल्याची माहिती हेमंत शामराव पाटील यांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (ads)
घटना कशी घडली?
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, श्री स्वामी समर्थ तोलकाट्यावर वजन करण्यासाठी बॅटरी, इन्व्हर्टर, कॅमेरे, डीव्हीआर व मशीन अशी महत्त्वाची साधने लावलेली आहेत. 29 आगस्ट रोजी सकाळी भुषण हेमंत महाजन यांनी तोलकाटा उघडले तेव्हा बॅटरी, इंटरनेट सेटअप, कॅमेरे, डीव्हीआर यासारखे मौल्यवान साहित्य चोरीस गेलेले दिसून आले. ही सामग्री चोरीस गेल्याचे लक्षात येताच हेमंत महाजन यांनी तात्काळ निंभोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.(ads)
काय चोरीस गेले?
चोरी झालेल्या साहित्यामध्ये बॅटरी, इन्व्हर्टर, सुरक्षा कॅमेरे तसेच डीव्हीआरचा समावेश असून ही साधने तोलकाट्याच्या कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे हेमंत महाजन यांनी सांगितले. या घटनेमुळे तोलकाट्याचे नियमित कामकाज देखील विस्कळीत झाले आहे.
परिसरात खळबळ
या चोरीच्या घटनेमुळे धामोडी-कांडवेल रोड परिसरातील नागरिक व व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी बंद तोलकाटा ऑफिसचे कुलुप तोडून मौल्यवान साहित्य चोरीस जाणे ही गंभीर बाब मानली जात आहे.(ads)
पोलिसांचा तपास सुरू
तक्रार मिळताच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून अज्ञाताचा शोध सुरू करण्यात आला आहे. हेमंत शामराव महाजन यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे चोरी गेलेल्या साहित्याचा शोध घेऊन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. निंभोरा येथील एपीआय हरिदास बोचरे यांनी पुढील तपासणी साठी कर्मचाऱ्यांना सुचना केल्या.



