विद्यार्थीनींच्या समस्या ऐकून घेतल्या, बस चालक, वाहक यांचेवर कारवाई करा - आमदार चंद्रकांत पाटील यांची मागणी
दिनांक 29 रोजी मुक्ताईनगर विधानसभाक्षेत्राचे आमदार सावदा येथे जात असतांना विटवे गावात भेट दिल्यावर ऐनपूर येथून विटवे येथे विद्यार्थिनी पायी जात होत्या त्यावेळी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांना थांबवून विचारणा केली. (ads)
विद्यार्थिनी यांनी सांगितले कि आम्ही दररोज विटवे ते ऐनपूर कांडवेल जाणारी बस मध्ये जातो वाहन चालक यांनी दिनांक 29ऑगस्ट रोजी शाळा सुटल्या नंतर कांडवेल ते ऐनपूर, निंबोल विटवे, सांगवे मार्गे रावेर येथे बस जाते पण बस चालक यांनी विटवे मार्गे बस आणली नाही व मुलींना निबोल येथे सोडून अजंदे मार्गे स्वतःच्या मर्जीने घेऊन गेले व उद्धट व उर्मट भाषेचा वापर केला.(ads)
व शनिवारी बस येतच नाही म्हणून सांगवे, विटवे गावातील मुलींना भर पावसात आम्हाला पायी जावे लागते, आमदार चंद्रकांत पाटील यांनी सदर विद्यार्थिनीची समस्या ऐकून संबंधित बस चालक, वाहक यांचेवर तात्काळ कारवाई करा असे निर्देश दिले व यापुढे असे काही झाले तर मला फोन करा असे सांगितले,या अगोदर ही विटवे गावाचे लोकनियुक्त सरपंच मुकेश चौधरी यांनी बसचालक व वाहक यांची आगार प्रमुख यांचे कडे तक्रार दाखल केली आहे यावेळी विटवे गावातील गावकरी विद्यार्थी, विद्यार्थिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.



