आंबापाणी अंगणवाडी भरती प्रकरण – स्थानिक आदिवासी महिलेला न्याय : पॅंथर सतिषभाऊ अडकमोल यांच्या प्रयत्नांना यश

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

यावल (सुवर्ण दिप वृत्तसेवा) आंबापाणी येथील अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेत स्थानिक आदिवासी महिलेला डावलून बाहेरगावच्या महिलेला भरती करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ही बाब मोहरळा येथील सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता पॅंथर सतिषभाऊ अडकमोल यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने पुढाकार घेत शासन व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले.  (ads)

 गटविकास अधिकारी मॅडम व बाल विकास प्रकल्प अधिकारी मॅडम यांच्याकडे त्यांनी लेखी निवेदन देऊन पाठपुरावा केला. तसेच स्थानिक आदिवासी महिलेला न्याय न दिल्यास संविधानिक मार्गाने उपोषण करण्याचा इशारा दिला होता.अखेर शासनाने योग्य ती कार्यवाही करत २९ ऑगस्ट रोजी अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली. यात आंबापाणी येथील स्थानिक आदिवासी महिला मनीषा श्रीराम पावरा यांची अंगणवाडी सेविका म्हणून निवड करण्यात आली.  (ads)

 सतिषभाऊ अडकमोल हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील अन्याय, अन्यायकारक भरती प्रक्रिया आणि आदिवासी बांधवांचे प्रश्न यावर सातत्याने लढा देत आहेत. त्यांची जिद्द, चिकाटी आणि समाजासाठी काम करण्याची वृत्ती यामुळेच आंबापाणी येथील स्थानिक आदिवासी महिलेला न्याय मिळवून देणे शक्य झाले.स्थानिक समाजात आता त्यांच्या या कार्याचे प्रचंड कौतुक होत असून "आदिवासी समाजाचा खरा आवाज म्हणजे सतिषभाऊ अडकमोल" अशी भावना व्यक्त केली जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!