राष्ट्रीय CBSE ज्युदो स्पर्धे साठी त्रिष्णा वाघ हीची निवड !
रावेर तालुक्यातील गाते स्टेशन येथील मा.उपसरपंच मनोज वाघ व गावच्या पोलिस पाटील मनिषा वाघ यांची सुकन्या त्रिष्णा हिने दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी शिर्डी येथे पार पडलेल्या CBSE School Games South Zone-2 ज्युदो स्पर्धेत, कल्पविजय स्पोर्ट्स अकॅडमी, अमळनेर येथील उगवती खेळाडू त्रिष्णा मनोज वाघ हिने - 52 किलो वजन गटात शानदार कामगिरी करत सिल्व्हर पदक पटकावले.
या उल्लेखनीय यशाच्या जोरावर तिची श्रीगंगानगर (राजस्थान) येथे 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय CBSE ज्युदो स्पर्धेसाठी "साउथ झोन" संघात निवड झाली आहे. ही निवड तिच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे व कौशल्याचे फलित आहे.
स्पर्धा स्थळी CBSE चे निरीक्षक श्री. संजय धोपावकर व संतोष खैरनार यांच्या हस्ते त्रिष्णाचा पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
त्रिष्णा हिच्या या यशाबद्दल कल्पविजय स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष श्री. विजय वाघ, अमळनेर तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षकवृंद आणि क्रीडाप्रेमींनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.
या यशामागे तिचे काका श्री. सचिन वाघ (NIS ज्युदो प्रशिक्षक) यांचे मार्गदर्शन तसेच महिला प्रशिक्षक कु. अश्विनी सोळंके यांचे सातत्यपूर्ण मेहनत आहे.