बंदुकीचा धाक दाखवून लुट प्रकरणी ...अवघ्या काही तासांतच 4 आरोपींना अटक : सावदा पोलीसांची सजग कारवाई

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

बंदुकीचा धाक दाखवून लुट प्रकरणी ...अवघ्या काही तासांतच 4 आरोपींना अटक : सावदा पोलीसांची सजग कारवाई

बंदुकीचा धाक दाखवून लुट प्रकरणी ...अवघ्या काही तासांतच 4 आरोपींना अटक : सावदा पोलीसांची सजग कारवाई 

रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

 सावदा ता.रावेर या शहराजवळ काल दि 27रोजी भरदिवसा पिंपरुड -सावदा रस्त्यावरील स्मशानभूमी च्या पुढे बंदुकीचा धाक दाखवून दिड लाख रुपये लुटून नेले होते याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता सावदा पोलीसांनी तातडीने तपास चक्रे फिरवून या गुन्ह्याचा तपास सुरू केला व काही तासांतच या भरदिवसा झालेल्या लूटप्रकरणाचा उलगडा करण्यात सावदा पोलिसांना यश आले आहे. गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून दीड लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही तासांत सापळा रचून अटक केली. या कारवाईमुळे परिसरात दिलासा व्यक्त होत आहे. (ads)

घटनेचा मागोवा

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील साजीद शेख अकबर व त्यांचा मित्र बबलू खान अय्यूब खान हे 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजता टायरांची विक्री करून मिळालेली दीड लाख रुपयांची रोकड घेऊन दुचाकीने भुसावळकडे जात होते.

यावेळी पिंपरुड रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ पांढऱ्या रंगाच्या तवेरा कारमधून आलेल्या कुख्यात गुंड अजरोद्दिन उर्फ अज्जू डॉन (रा. बऱ्हाणपूर) आणि त्याच्या साथीदारांनी गावठी पिस्तुलाचा धाक दाखवत रोकड हिसकावली आणि पसार झाले.

पोलिसांची सजग कारवाई

घटनेची माहिती मिळताच सावदा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सापळा रचला तपास चक्रे फिरवली.व काही तासांच्या आतच पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आले.दाखल गुन्ह्यातील आरोपींना अटक केली आहे. 


1. अजरोद्दिन उर्फ अज्जू डॉन उमर (वय 40, गांधी कॉलनी, लालबाग, जि. बऱ्हाणपूर)


2. कमरोद्दीन इनोद्दीन (वय 42, गांधी कॉलनी, लालबाग, जिल्हा बऱ्हाणपूर) 

3. शेख फारुख अलाउद्दीन (रा. ऐनपूर, ता. रावेर)


4. तौसिफ शेख अफजल (रा. रावेर)

या कारवाईत लुटीतील मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली टवेरा कार जप्त करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

पुढील तपास सदर आरोपींवर भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 310 (2), 311, 115(2), 351(2)(3), 352 व शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. या कारवाईचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल पाटील, उपनिरीक्षक अमोल गर्जे व उपनिरीक्षक राहूल सानप यांच्या सह पोलीस कर्मचारी करीत आहेत.

सावदा पोलीसांनी  अवघ्या काही तासांतच आरोपींना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच सावदा पोलिसांविषयी विश्वास वाढला आहे. स्थानिकांतून सावदा पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!