बोदवडमध्ये भंते विनाचार्य यांच्या उपस्थितीत भव्य धम्म ध्वज यात्रा व सभा संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

बोदवडमध्ये भंते विनाचार्य यांच्या उपस्थितीत भव्य धम्म ध्वज यात्रा व सभा संपन्न

 बोदवडमध्ये भंते विनाचार्य यांच्या उपस्थितीत भव्य धम्म ध्वज यात्रा व सभा संपन्न

सुवर्ण दिप वृत्तसेवा (ता.बोदवड, जि.जळगाव) : दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी, मंगळवार वार, बोदवड येथे भंते विनाचार्य यांच्या उपस्थितीत भव्य धम्म ध्वज यात्रा व सभेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी बौद्ध बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरसेवक राजूभाऊ सपकाळे (भुसावळ) होते. (ads)

 प्रमुख आयोजक म्हणून ईश्वर भाऊ सुरवाडे, संदीप भाऊ सुरळकर, सागर भाऊ बावस्कर, अबरार शेख व सचिन भाऊ बावस्कर यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.धम्म ध्वज यात्रेला शेकडो अनुयायी सामील झाले. “बुद्धं शरणं गच्छामि”, “जय भीम” अशा घोषणांनी संपूर्ण बोदवड शहर दुमदुमून गेले. यात्रेच्या शेवटी आयोजित सभेत भंते विनाचार्य यांनी धम्माच्या शिकवणीवर मार्गदर्शन केले.

भंते विनाचार्य म्हणाले की, “आजच्या काळात समाजात समानता, बंधुता आणि अहिंसा टिकवून ठेवण्यासाठी धम्माचा संदेश लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.”

सभेत बौद्ध बांधवांनी सामाजिक सलोखा, शिक्षण व जागरूकतेची शपथ घेतली. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!