यावल तालुक्यात शासनाच्या बांधकाम मजुर भांडी वाटप योजनेचा लाभ मिळत नसल्याने संतप्त महिलांनी केले रास्ता रोको आंदोलन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 यावल तालुक्यात शासनाच्या बांधकाम मजुर भांडी वाटप योजनेचा लाभ मिळत नसल्याने संतप्त महिलांनी केले रास्ता रोको आंदोलन


यावल  ( सुरेश पाटील )

तालुक्यात महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळाद्वारे राबविण्यात येत असलेल्या नोंदणीकृत कामगारांना मोफत भांडी वाटप योजने अंतर्गत महिलांना मिळणारे भांडी योजना लाभ मिळवुन देण्यासाठी स्वार्थी दलालांचा हस्तक्षेप वाढले असुन या बांधकाम मजुरा साठीच्या जनहित योजनेचे पुर्णपणे बारा वाजले असुन,लाभ मिळवण्या साठी संत्पत महिलांनी केले रास्ता रोको आंदोलन. 



                       यावल तालुक्यात या योजनेच्या  अमलबजावणी ही ऑनलाईन मुळे होत असल्याने मोठा गोंधळ व समस्या निर्माण होत असल्याने ही योजना ऑनलाईन ऐवजी ऑफ लाईन करावी अशी ही मागणी आंदोलनकर्ता महिलांच्या वतीने यावेळी करण्यात येवुन प्रशासनाच्या भोंगळ व गोंधळलेल्या कामकाजा बाबत शेकडो गरजु महिलांनी उतरून नाराजी व्यक्त केली .                 यावल शहराच्या रस्त्यावर,भुसावळ टी पाँईट वर शेकडो महिलांनी केलेल्या आंदोलना मुळे एक तास वाहतुकीची कोंडी झाली . यावेळी यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी या आंदोलनात सहभाग घेत महिलांचे प्रश्न व व्यथा संबधित विभागाच्या अधिकारी यांच्या निर्देशनात आणुन दिली व बांधकाम मजुर महीलांच्या समस्या मांडल्या. या आंदोलनाचे नेतृत्व महिला कार्यकर्ता चंद्रकला इंगळे यांनी केले.या आंदोलतात शेकडो महीलानी सहभाग घेत महिलां बांधकाम मजुर कुटुंबांची समस्या व अडचणी मांडल्या .

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!