रावेर येथील रावेर शिक्षण संवर्धक संघ संचलित सरदार जी .जी .हाय. व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले .याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष रावेर शिक्षण संवर्धक संघाचे सन्माननीय संचालक मा. श्री .महेश अत्रे हे होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा .श्री .देवेंद्र मिसर, उपाध्यक्ष मा. डॉ .राजेंद्रआठवले, चेअरमन मा. श्री. शितल पाटील, सचिव मा. श्री .अक्षय अग्रवाल ,संचालक मा .श्री .शैलेंद्र कुमार देशमुख ,मा. श्री .संतोषशेठ अग्रवाल ,मा .श्री. तुषार मानकर, मा .श्री. विजयलाल लोहार ,संस्थेचे सहसचिव मा .श्री. बी .आर. महाजन उपस्थित होते. (ads)
तसेच सौ. के. एस. ए.हाय . व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती . नीलम पुराणिक उपस्थित होत्या. संस्थेच्या व परिसरातील काही दात्यांनी आपल्या स्वखर्चातून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्य म्हणजेच स्कूल बॅग व वह्यांचा सेट या स्वरूपात मदत केली. यावेळी एकूण 85 कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप दात्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. (ads)
या दात्यांमध्ये सौ .लीना देशमुख ,सौ .प्रतिभा पाटील, श्री .भास्कर महाजन( रावेर),श्री. कैलास कोळी (मोरगाव) ,श्री. विजय महाजन (चोरवड), श्री. सुधाकर नाईक (रावेर ),तसेच संस्थेचे संचालक श्री .संतोष शेठ अग्रवाल ,श्री .अक्षय अग्रवाल, श्री. महेश अत्रे यांचा समावेश आहे. "दिलेल्या मदतीचा विद्यार्थ्यांनी योग्य उपयोग करून घ्यावा ,कॉपी करू नये व जीवनात आपले उद्दिष्ट साध्य करावे "असे मार्गदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. श्री. राजेंद्रजी आठवले यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.(ads)
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक मा. श्री .महेश अत्रे यांनी देखील आपल्या अध्यक्षीय भाषणातून या उपक्रमाचे अभिनंदन व कौतुक केले .याप्रसंगी मा .संचालक तुषार मानकर यांना जिल्हास्तरीय फोटोग्राफीमध्ये प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले .या प्रसंगी सरदार जी. जी .हाय .व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा .श्री .आर .आर .पाटील, उपमुख्याध्यापक प्रा .श्री .एन. जे .पाटील ,उपप्राचार्य प्रा .श्री. शैलेश राणे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.(ads)
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा .श्री .व्ही. व्ही. पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. के . ए.नाईक यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सौ.आर. बी. सरोदे यांनी केले .यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.



